काय ते सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि काय तो शिरपूर – शहादा रस्ता; सगळ कस ओके मध्ये आहे
पावसाळासुरू पण खड्डे जैसे थे तैसेच अपघाताची मालिका सुरूच
त-हाडी -महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेश या तीन राज्यांना जोडणारा अंकलेश्वर- बऱ्हाणपुर राज्य मार्गावरील शिरपूर ते शहादा हा रस्ता महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो. पण हा रस्ता राज्य राष्ट्रीय महामार्ग कसला ? हा तर मरणाच्या दारात नेणारा मार्ग बनलाय आहे.खड्डे इतके, की चांगला रस्ता शोधावा लागतो. त्यात साइडपट्ट्या व ठिकठिकाणी असेलेले लहान मोठे पुलांना कठडे फक्त नावाच राहिलेले दिसत आहेत.
या रस्त्याने जायचे म्हटले, जीव धोक्यात तर वाहनांचे स्पेअर पार्ट आणि प्रवाशांची हाडे खिळखिळी झालीच म्हणून समजा.रस्त्याची अवस्था पाहूनच अंगावर काटा फुटतात. त्यात दुचाकीस्वारांचे हाल तर विचारूच नका. परिणामी, अपघातांचे प्रमाण वाढले; पण बांधकाम विभागावर त्याचे परीणाम काय ? आजवरच्या लोकप्रतिनिधींनीही याकडे डोळेझाक केल्याचेच दिसते.रस्ता राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट केला असल्याचे बोलले जात आहे. रस्त्याचे भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयामार्फत चौपदरीकरणाचे काम सुरू होईल अशा चर्चेला उधाण येवू लागले आहे तर रस्ता बाबत कामाविषयी अध्याप संभ्रमच आहे. मात्र तोपर्यंत रस्त्याच्या देखभाल- दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.
बांधकाम विभागाला डागडुजीला मुर्हुत सापडेना….
पावसाळा सुरू झाला पण रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम काही झाले नाही.शिरपुर ते शहादा सदर रस्ता हा 50 ते 55 कि.मी अंतराचा असून या मार्गवरुन नेहमी शालेय विद्यार्थी विद्यार्थींनी प्रवास करीत असतात. तसेच या रस्त्यावर नेहमी लहान मोठे अपघाताची मालिका नेहमी सुरुच असते. तर या रस्त्यावर काही वेळा अपघाताचे मोठे स्वरूप हि घडते. व त्यात निंषपाप लोकांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागत आहेत.तरी देखील संबंधित विभागाला रस्ता दुरूस्ती बद्दलची जाग येत नाही.अजून किती निंषपाप लोकांचे बळी घेण्याचे वाट पाहत आहेत का ? असे अनेक प्रश्न नागरीकांकडुन उपस्थित होत आहेत.रस्त्याचा डागडुजीला मुर्हुत सापडत नाही अशी चर्चा संध्या सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल रंगु लागली आहेत.
लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष नागरीकांमध्ये नाराजी…
नंदुरबार लोकसभा एक खासदार तीन आमदार दोन खासदार लाभलेले असून आमदार खासदार यांच्या शिरपूर -शहादा या मार्गावर नेहमी ये – जा व कार्यक्रम असल्याने ते प्रवास करतांना दिसून येतात. मात्र या महामार्गावर खड्डे बुजविण्याचे काम अद्यापही झाले नसल्याने या महामार्गावर खड्डे मुक्त रस्त्यांचे “अच्छे दिन”केव्हा येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने खड्डे मुक्त रस्ते हे अभियान चालविण्यात आले का नाही.याचा मात्र अध्यापही कोणालाच थांगपत्ता नसल्याचे समजते.तसेच यावर्षी शिरपूर ते शहादा रस्तयावरील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणाला दिले होते कि नाही.असा प्रश्न या उपस्थितीत होत आहे.खड्ड्या मुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहे.तर काहींना कायमचे अपंगत्व येत आहे. अनेकांना मोठ्या प्रमाणावर दुखापती होत असून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
शिरपूर ते शहादा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम नेहमी थातुरमातुर पद्धतीने केले जाते. त्यामुळे या रस्त्यावर महिन्याभरातच खड्डे “जैसे थे” होत असतात.तरी या समस्याचा विचार करून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा कामाला मुर्हुत साधावे व पाऊस थाबताच रस्त्याचा डागडुजीचा कामाला गती देऊन सुरवात करवी अशी मागणी सुज्ञनागरीक करीत आहेत.
मुरूम माती नको साहेब डांबरीकरण करा….
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शिरपूर ते शहादा व शहादा दोंडाईचा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शेतकरी संघर्ष समिती, विविध गावातील ग्रामस्थ ,सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांच्या तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्याचा होणारा त्रास मांडत संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.कार्यालयात लोक संसदही भरली.त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच रस्ता दुरुस्तीचे लेखी आश्वासन दिले असल्याचे समजते. रस्त्यावरील ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजविणसाठी नागरिकांच्या समजुती व समाधानासाठी संबंधित विभागाकडून मुरूम माती टाकले होते.
मात्र आता पावसाळा सुरू होवून दोन महिने होत आले.पण रस्त्यावर वरील खड्डे बुजविण्याचे काम काही झाले नाही. रस्त्यावर मुरूम माती टाकुण काही रस्त्याचे भविष्य सुधरणार नाही ये म्हणून मुरूम माती नकोय साहेब रस्त्यावर डांबरीकरणच करा अशी मागणी नागरिकांमध्ये सुरू आहे.







