सोनवद धरणात पाणी टाका =प्रकाश पाटील *
================================
डोंगरगाव ( आर आर पाटील)=
शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव जवळ महाराष्ट्र शासनाचा सोनवद धरण हा मध्यम प्रकल्प आहे या धरणात सध्या 10 एम सी एफ टी एवढाच पाण्याचा किरकोळ पाणी साठा शिल्लक आहे सध्या परिसरात पावसास सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने लहान नाल्यांना देखील पाणी येत आहे ते पाणी सरळ पांझरा नदीत येते निमखेडी तालुका धुळे या गावाजवळून या धरणात पाज रा नदीचे पाणी येण्यासाठी एक कालवा तयार करण्यात आलेला आहे
या कालवा द्वारे थेट सोनवद धरणात पा जरा नदीचे पाणी येते म्हणून या ठिकाणी जो काही पाणीसाठा येत आहे तो सरळ पांजरा कालव्याद्वारे सोनवद धरणात टाकण्यात यावा कारण या धरणावर 2147 हेक्टर शेत जमिनीचे सिंचन अवलंबून आहे म्हणून आतापासूनच धरणात पाणी टाकण्यास सुरुवात करण्यात यावी म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे अशा पद्धतीने दरवर्षाप्रमाणे सोनवद धरण 100% पाण्याने भरेल म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी आतापासूनच काळजी घ्यावी व सो न व द धरणात पाणी टाकण्यास सुरुवात करावी अशी मागणी धुळे व नंदुरबार जिल्हा डी डी सी बँकेचे संचालक प्रकाश पाटील व शेतकरी वर्गाने यांनी केलेली आहे