वरुळ येथील कन्या विद्यालयात इ.8वी ते 12वी चे वर्ग सुरू
.त-हाडी तालुक्यातील वरुळ येथील एच.आर. पटेल कन्या माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयात शासन आदेशान्वये कोविड-19 च्या नियमांचे पालन करून इ.8 वी ते इ. 12 वी च्या वर्गातील विद्यार्थिनींचे औक्षण करुन व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
✳️ यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.पी.आर.साळुंखे यांनी गुलाबपुष्प देऊन विद्यालयातील विद्यार्थीनीचे स्वागत केले.तसेच कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता शासन नियमांचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचना दिल्यात.
✳️ याप्रसंगी प्राचार्य पी.आर. साळुंखे, पत्रकार श्री.भिका चव्हाण, श्री.डी.एन.माळी, श्री.एम.व्ही.पाटील, श्री.बी.एन.पाटील, सौ.एम.बी.पाटील, श्रीमती पी.आर.मोरे, श्रीमती एस.एस. पाटील, श्रीमती वाय.डी.पाटील, श्री.एस.एम.झटकर,श्री.एस.सी.शिंपी,
श्री.एन.एस.म्हस्के,श्री.एस.एच.निकुंभे, श्री.राकेश मोरे,श्री पी.टी.पवार आदि उपस्थित होते.







