घोणस / काटेरी / डंख मारणारी अळी ओळख समज गैरसमज व व्यवस्थापन – सतीश कचरे प्र तालुका कृषि अधिकारी माळशिरस
नातेपुते (श्रीकांत बाविस्कर) :
काही दिवसापासून वृत्तपत्र दूरदर्शन ‘ विविध समाजिक मेडीया वरून काटेरी / घोणस अळीबाबत चर्चा बातम्या आपल्या परिसरात दिसून येत आहेत त्यामुळे शेतकरी व मजूर वर्गात गैरसमज व भितीचे वातावरण झाले आहे. ओळख – ह्या अळीच्या १३३ फॅमीली पैकी ९फॅमीली गंभीर पॅथोफिजोलोजीकल परिस्थिती निर्माण करतात .
अळी पंतग अतिशय संथ असतात त्यामुळे परभक्षी कडून स्वतः चे संरक्षण होणेसाठी भडक रंग त्यावर टिपके व अगावर काटे विकसित केलेले असतात या काट्यामध्ये विष असते . वावर व पिक – ही अळी प्रामुख्याने ऊस ‘ एरंडी ‘आंबा’ केळी ‘ डाळीब ‘ लिंबूवर्गीय फळे ‘ देशी बदाम तणे ‘ कापुस ‘ मुग शेवगा ‘ शोभेची झाडे यावर आढळून येते . ह्या अळ्या पानाचा भाग कुरतडून खातात . प्रार्द्रूभाव मुळे नुकसान पातळी कमी असते . मनुष्य किंवा प्राणी यांचा संपर्क आल्यास मधमाश्या ज्याप्रमाणे स्वसंरक्षणार्थ डंख मारून काट्याद्वारे विष सोडतात त्याप्रमाणे ही अळी अगावरील काटे द्वारे विष सोडते व काट कातडीत रुतून राहतो . या विषामुळे त्रीव जळजळ होणे पुरळ उटणे ‘ सुज ‘ मळमळ ‘ ॲलजी असेल तर श्वासनास त्रास (दूर्मिळ लक्षण ) इत्यादी लक्षणे तास दोन तास दिससात .
पंरतू जीवीत हानी होत नाही हासमज काढून टाकणे गरजेचे आहे . उपचार – १ डंख ठिकाणचा काटा चिकटपट्टी लावून काढून टाकावा . २ – जागा साबनाने स्वच्छ धुवावी व कोरडी करावी . ३ – जागेवर रबीग अल्कोहोल लावावे ४- कॅलामाइन लोशन क्रीम लावावी . ५ -डंख ठिकाणी बर्फाचा तुकडा ठेवावा म्हणजे जळजळ थांबेल . ६ -शेतात काम करणाऱ्यांनी पूर्ण अंगभर कपडे परिधान करावीत . ७- डंख ठिकाणी खाण्याचा सोडा व पाणी मिश्रन लावावे . ८- अपवादात्मक परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला व उपचार करावेत . अळीचे व्यवस्थापन – १ – पिकावर प्रद्रूभाव ग्रस्त क्षेतात कलोरो किंवा क्विनॉलफॉस 2 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी . २ – प्रार्दुभाव ग्रस्त क्षेत्रात इमामेक्टोन बेझोएट ४.४ मिली प्रति १०लिटर पाण्यात स्टिकरसह फवारणी करावी . तरी शेतकरी बांधवानी गैरसमज भिती न बाळगता वरील उपाययोजना व अळीचे व्यवस्थान करावे हे तालुका कृषि अधिकारी कार्यालयाचे अहवान आहे.







