धुळे जिल्हा कार्यकारणीवर निवड झालेल्या शिरपूर तालुक्यातीलपदाधिकारी यांचा सत्कार सोहळा संपन्न
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आज हॉटेल मल्हार रेजन्सी या ठिकाणी पार पडला, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मर्चंट बँक संचालक श्री रामचंद्र उखाठाकरे होते .
धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष चिमणभाऊ डांगे आणि प्रदेश सरचिटणीस सुनील भाऊ वाघ यांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारणीजाहीर झाली.
त्या सर्व पदाधिकाचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता व्यासपीठावर दशरथ धनगर सर , निंबा आण्णा धनगर, डॉ. सचिन सूर्यवंशी, सूतगिरणी संचालक मल्हारराव भलकार , गणपत धनगर उपस्थित होते. यावेळी किरण भलकार, विशाल भलकार, माजी सरपंच संजय धनगर, उमेश धनगर सुनील भलकार, ज्ञानेश्वर हडपसर, मुकेश बिलाडे, सतीष निळे, महेश धनगर, या पदाधिकाचा सत्कार करण्यात आला.
या सर्व पदाधिकाऱ्यांचे सूतगिरणीचे माजी संचालक सुदाम नथू भलकार, पीपल्स बँक चे माजी संचालक उखा बंडू ठाकरे, पीपल्स बॅकचे संचालक नंदू ठाकरे यांनी अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे नियोजन धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा. उदय भलकार यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गांगेश्वर धनगर, व जगदीश धनगर व आभार मुकेश आढावे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देविदास निळे , भूषण पेंढारकर,मुकुंदा पाकळे, दिलीप पाकळे, समाधान धनगर, निलेश आढावे, भरत आढावे, सुभाष भलकार, प्रेमराज हिवराळे, अरुण सोनवणे, रावसाहेब भलकार, राजेंद्र पाकळे, ज्ञानेश्वर धनगर, यांनी प्रयत्न केले.







