पाऊस जोमात शेतकरी कोमात
धुळे प्रतिनिधी दिपक पवार
बोरी परिसरातील पावसाने कापशी मका बाजरी मूग उडीद मिरची या पिकामध्ये पाणी साचल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकार्यामधून व्यक्त होत आहे.गेल्या चार ते पाच दिवसापासून परिसरात दिवस रात्र पाऊस सुरू असल्यामुळे जमिनी संपूर्णपणे ओल कायम आहे
तांडा कुंडाणे,कुंडाणे, वेल्हाणे,हडसुने आदी गावात सतत पाऊस पडत आहे.या पावसाने बहरलेले पिकामध्ये पाणी साचले आहे पावसाचे पाणी जमित मुरत नसल्यानेपिके पिवळी पडू लागली आहे आतापर्यंत झालेल्या सततच्या पावसाने मिरची पिके सडले आहे गवत जोमात पीक कोमात गेली आहे गवतात पाण्यात तंग धरून बसलेल्या मक्याने कणसे धरली मात्र त्यावर लष्करी अळीने विळखा घातल्याने लागवडीचा व बियाण्याचा खर्च देखील निघणार नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे
यामुळे उत्पादन घटनेची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे अनेक ठिकाणी शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे पिके वाचून शेतकरी पिकातून पाणी बाहेर काढण्यासाठी धडपड करत आहे शेतात पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी चिबडल्या आहे या जमिनी मशागत करणे सुद्धा अवघड झाले आहे पिकांना मर्या पेक्षा जास्त पाऊस झाल्याने मग का कपाशी यांची वाढ खुंटली असून या पिकातील अपेक्षित उत्पादना हाती लागणार नसल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे
चौकट
गेल्या चार ते पाच दिवसापासून परिसरात दिवस रात्र पाऊस सुरू असल्यामुळे माझी जमीन पूर्णपणे चिडले आहे माझे जमीन तांडा कुंडाणे प्र (वे)शिवारात आहे माजी क्षेत्र पाण्यात गेले कर्ज व उसनवारी पेरणी केली केलेला खर्च पाण्यात गेला काहीतरी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तेथील शेतकरी सोमा दिनकर पवार व शिवारातील शेतकऱ्यांनी केले आहे
परिसरातील विहिरी मोठ्या प्रमाणात भरले असून त्याचे पंचनामे व्हावे अशी मागणी गावकऱ्याकडून होत आहे जातीच्या पावसामुळे तांडा कुणाला परिसरातील अशा प्रकारे पाणी साचल्याने पिके पिवळी पडू लागले आहेत







