घराजवळील घाण कचरा उचलण्याची नाईकनवरे यांची नातेपुते नगरपंचायत कडे मागणी :
नातेपुते( श्रीकांत बाविस्कर) :
नातेपुते येथील प्रभाग क्रमांक सात मधील रहिवाशी व वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुका संघटक बाबासाहेब प्रभू नाईकनवरे यांनी बाजार तळ येथील आपल्या घराजवळी घाण कचरा गवत झाडी उचलण्याची मागणी नातेपुते नगरपंचायतकडे निवेदनाद्वारे केले असून निवेदनामध्ये म्हटले आहे की बाजार तळ जवळील माझ्या घरासमोर भरपूर घाण गवत कचरा झाडे असून त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून सदरील अस्वच्छता नागरिकांच्या आरोग्यास हानीकारक आहे. तरी तो कचरा नातेपुते नगरपंचायत आरोग्य विभागाने साफ करावा असे निवेदन नातेपुते नगरपंचायत कार्यालयात येथे दि, ७ सप्टेंबर रोजी दिली आहे,







