आमदार अमरीशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त भोरखेडा विद्यालयात आरोग्य व रक्त गट तपासणी शिबिर संपन्न
त-हाडी
आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने भोरखेडा येथे शिरपूर तालुक्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरीश भाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्ताचे औचित्य साधत मोफत विद्यार्थ्यांचे आरोग्य ,CBC व रक्त गट तपासणी शिबिर घेण्यात आले . आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखेचे प्राचार्य आर.एफ.शिरसाठ होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र खर्दे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज पाटील,विद्यालयाचे पर्यवेक्षक पी.व्ही.पाटील होते.
आरोग्य तपासणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची अधिष्ठात्री देवता सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.
इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ,रक्तगट ,रक्ताचे प्रमाण इत्यादी तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र खर्दे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील,प्राथमिक आरोग्य केंद्र वाठोडा येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मेघराज राठोड, प्राथमिक आरोग्य केंद्र खर्दे येथील लॅब टेक्निशियन मुकेश सोनवणे व गायत्री सोनवणे तसेच . दीपक येशी यांच्या उपस्थितीत पार पडली.
अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य आर.एफ.शिरसाठ यांनी आमदार अमरीशभाई तालुक्यातील नागरिकांसाठी विविध प्रकारचे मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करतात त्यातून तालुक्यातील अनेक नागरिकांच्या आरोग्याचा समस्यांचे निराकरण झाले आहे हाच विचार करून विद्यालयातील विद्यार्थी सदृढ राहावा या उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले व आरोग्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
तर डॉ. मनोज पाटील यांनी आरोग्य व आहार या विषयावर मार्गदर्शन करताना आरोग्य सांभाळताना आहाराची उपयुक्तता, सकस आहारतून निरोगी जीवनाची दिशा याबद्दल विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.आपला रक्तगट माहीत असणे आवश्यक आहे वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण रक्तदान करू शकतो कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक.पी व्ही पाटील सर यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी .एन.वाय. बोरसे यांनी केले तर एस.आर.देसले यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व.डी.आर.राजपूत, एन.डी.चव्हाण,आर.जी.पाटील,एस.जे.पाटील,एस.एन.पाटील,एस.एम.पाटील,पी.टी.चौधरी,व्ही.बी.शर्मा,व्ही.एस.इशी,जे.डी.पाटील, के.एस. कोळी,एस. एस. निकुंभे,एम.टी.पटेल, दिपाली निकम,काजल राजपूत, तुषार पाटील, आफ्रिद पटेल, आवेश काजी, चंदन पावरा, संजय चौधरी, जाधव जी.टी. आहिरे डी.एस.अनिल खुटे, विवेकानंद पवार, केवळ सिंग राजपूत, शांतीलाल शिरसाट यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले







