पोदार जम्बो किड्स मायणी मध्ये हिंदी दिवस उत्साहात संपन्न
पोदार जम्बो किड्स मायनी मध्ये नुकतीच हिंदी दिवस ऍक्टिव्हिटी संपन्न झाली. पोदार जम्बो किड्स मायणी मध्ये सर्व मुले सहा वर्षाच्या आतील आहेत. या सर्व बाल चमूनी राष्ट्रीय हिंदी दिवसानिमित्त भारतातील प्रत्येक राज्यातील वेशभूषा सादरीकरण केले व संपूर्ण भारतामध्ये विविधतेतून एकता दाखवण्याचा प्रयत्न केला.
सदरच्या शाळेतील लहान मुलांनी पंजाबी , गुजराती, राजस्थानी, महाराष्ट्रीयन, केरळी, तमिळी, असामी, बंगाली, अशा विविध प्रकारच्या वेशभूषा घालून आपापले सादरीकरण केले आणि हिंदी दिवसानिमित्त भारत हा विविधतेने नटलेला देश असला तरी संपूर्ण भारतामध्ये हिंदी भाषा अग्रक्रमाने बोलली जाते, हम सब हिंदी है हे या एकतेतून दाखवून दिले. तसेच आज हिंदी दिनानिमित्त मुलांना पौष्टिक आहाराचे महत्व पपेट शोच्या साह्याने समजावून दिले .
पपेट शोच्या सादरीकरणांमध्ये फास्ट फूड शरीराला किती घातक आहे , व पौष्टिक आहार शरीराला किती फायदेशीर आहे हे सादरीकरण पपेट शोच्या साह्याने शाळेमध्ये करण्यात आले. ‘
अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी मधून पोदार जम्बो किड्स मायणी मधील विद्यार्थ्यांच्या मध्ये आश्चर्यकारक बदल दिसून येत आहेत त्यांच्यामध्ये स्टेज डेरिंग वक्तृत्व अभिनय खेळ कला क्रीडा याबरोबर बौद्धिक विकास अतिशय वेगाने घडवून येत आहे असे अनेक पालकांनी त्यांच्या अभिप्राय वहीमध्ये लिहून दिलेले आहे
भविष्यात पोदार जम्बो किड्स मायणी ही शाळा मायणी चे शैक्षणिक केंद्र ठरेल यात येत किंचितही शंका नाही. असे प्रतिपादन याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना बाबर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन रत्नशा शिंदे, भाग्यश्री माने , कांचन पाटील , जमिला मुल्ला , सावित्री माळी , रेखा माने
यांनी केले.







