शिरपूर तालुका खान्देश साहित्य संघाचे कवी संमेलन उत्साहात संपन्न
त-हाडी
शिरपूर तालुक्याचे विकासरत्न आमदार भाईसाहेब अमरीशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश साहित्य संघाने कवी संमेलनाचे आयोजन केलेले होते. सौ सावित्रीताई रंधे कन्या विद्यालयाच्या सावित्री दालन या सभागृहात हे संमेलन उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी सारिका रंधे या होत्या.
प्रास्ताविक शिरपूर तालुका खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष के.बी. लोहार यांनी केले. शिरपूर तालुक्यात साहित्यासाठी आणि साहित्यिकांसाठी पोषक असे वातावरण ज्यांनी निर्माण करून ठेवलेले आहे असे कर्मवीर व्यंकटरावजी रणधीर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिरपूर तालुका खान्देश साहित्य संघाने प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे वाढदिवसाचे औचित्य साधून कवी संमेलनांचे नियोजन वर्षभरासाठी केलेलें आहे.
प्रथमतः कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटरावजी रणधीर यांना विनम्रपणे वंदन करून तालुक्याचे विकासरत्न आमदार भाईसाहेब अमरीशभाई पटेल यांना वाढदिवसानिमित्त दिर्घायुष्य व निरामय आरोग्यासाठी साहित्य परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
या कवी संमेलनात साहित्यिकांना विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यात सर्व सन्माननीय सारिका रंधे, यशवंत निकवाडे, सिकंदर शेख, मायाताई साळुंखे, के.बी. लोहार या साहित्यिकांचा येथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कवी संमेलनात उपस्थित कवी, कवयित्री यांनी हिंदी, मराठी, अहिराणी, गझल, गीत अशा विविध प्रकारच्या रचनांचे गायन केले. व्यासपीठावर संमेलनाच्या अध्यक्षा सारिका रंधे यांसह सुभाषनाना अहिरे, प्रा. डॉ. रजनी लूंगसे, समिक्षक प्रा. डॉ. फुला बागुल, डॉक्टर मनोजभाऊ निकम, साहित्य संघाचे कार्याध्यक्ष बी. व्ही. श्रीराम, सत्कारार्थी यशवंत निकवाडे, सिकंदर शेख, मायाताई साळुंखे हे उपस्थित होते.
कवी संमेलनात व्यासपीठावर उपस्थित कवींसह आनंद देशमुख, प्रा. डॉ. नागोराव डोंगरे, के.बी.लोहार, एन एच महाजन, प्रा. डॉ. युवराज पवार,पत्रकार राजेंद्र जाधव, अरविंद भामरे, शिल्पा जैन, कविता बाविस्कर, प्रा. डॉ. संगीता पाटील, प्रा. अनुपमा तवर, मंगला दोरीक, आदि साहित्यिकांनी स्वरचित कवितांचे बहारदारपणे गायन करून सादरीकरण केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. निशांत गुरू यांनी नाशिक येथून ऑनलाईन सहभाग घेवून आपली कविता सादर केली. कवी संमेलनाचे सूत्रसंचालक प्रा. डॉ. नागोराव डोंगरे सर यांनी अतिशय छान असे सूत्रसंचालन करून संमेलनास उत्साहाचे वातावरण निर्माण केले.उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कवींना साथ दिली.
ज्येष्ठ साहित्यिक सुभाषनाना अहिरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कवी संमेलनाच्या अध्यक्षा मा. सारिकाताई रंधे यांनी शालेय मुलांच्या जीवनावर आधारित आपली कविता सादर केली.आणि सादरीकरण झालेल्या विविध विषयांवरच्या कविता,गझल,गीत यांबाबत गौरव उद्गार काढले. साहित्यिक चळवळीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
राजेंद्र जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले अल्पोपहार चहा घेऊन, फोटोसेशन करत, दिलखुलास गप्पागोष्टी करून, हसत खेळत वातावरणात कवी संमेलन सुंदर, प्रशस्त, अलिशान अशा सभागृहात संपन्न झाले







