सोलापूर जिल्हा शिवसेना मय केल्याशिवाय शांत बसणार नाही- पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधल्यानंतर प्रा. शंकर शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
पिलीव प्रतिनिधी/विश्वजीत गोरड-
प्रा. शंकर केशव शिंदे यांनी शिवसेनेचे श्री. लक्ष्मण हाके व प्रा महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनाप्रमुख उध्वजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते मा. खा. अरविंदजी सावंत साहेब, मा. ना. चंद्रकांत खैरे साहेब, मा. श्री. सुभाष देसाई साहेब यांच्या उपस्थितीत प्रा. शंकर केशव शिंदे यांनी शिवबंधन बांधले .शिवसेनेचे श्री. महादेव पुरी व लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात आपण संपूर्ण सोलापूर जिल्हा जिल्हयातील सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन शिवसेना मय केल्याशिवाय शांत बसणार नाही असे सांगितले. प्रा शंकर शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या शेतकरी संघाच्या संपर्कातील नेते असल्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाने जिल्ह्यात शिवसेनेला मोठी बळकटी मिळणार आहे. त्यांचे जिल्ह्यामध्ये या प्रवेशाबद्दल कौतुक केले आहे.







