आदेश धुडकावून आटपाडीत शेळ्या-मेंढ्यांचा बाजार रस्त्यावर भरला
आटपाडी तालुक्यांमध्ये शेळ्या मेंढ्यांच्या व जनावरांच्या बाजाराला बंदी असताना सुद्धा मार्केट कमिटीच्या समोरील रस्त्यावर आज शेळ्या मेंढ्यांचा बाजार काही प्रमाणामध्ये भरला होता.



लंम्पी कर्करोगाचे महाभयंकर संकट आल्याने जिल्हाधिकारी यांनी जनावरांचे सर्व बाजार बंद करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. याबाबत तहसील विभाग ,पशुसंवर्धन विभाग यांच्याकडून जनजागृती सुरू आहे .उपाय योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. असे असताना सुद्धा आज आठवडी जनावरांचा बाजार काही प्रमाणामध्ये भरला होता.
बाजार भरलेला समजल्यानंतर बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांनी येऊन व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना सूचना देऊन बाजार बंद करण्याचे सांगितले



परंतु लंम्पी कर्करोगासारखा महाभयंकर रोग आला असताना प्रशासनाच्या नियोजनासाठी सतत बैठका सुरू असताना, अनेक व्यापारी अनेक शेतकरी येऊन बाजार भरवला जातो. म्हणजेच प्रशासन जनजागृती करण्यासाठी कमी पडत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.



पशुवैद्यकीय विभागाकडे लंम्पी कर्करोगाची कोणतीही लस अद्याप उपलब्ध नाही. तसेच पशुसंवर्धन विभागाकडून जनजागृती कमी पडत असल्याचे यावरून निदर्शनास येत आहे .जर प्रत्येक गावोगावी जाऊन जनजागृती केली असती ,तर आज शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरलाच नसता .
परंतु पशुवैद्यकीय विभागाकडून जनजागृती कमी पडत आहे. भविष्यामध्ये लंम्पी कर्करोग फोपवला तर जनावरांचा सुपडा साफ होईल. या सर्व गोष्टीचा विचार करून पशुवैद्यकीय विभागाने जनजागृती करून जनावरासाठी लस त्वरित उपलब्ध करून द्यावी अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.







