खलाने गटासाठी लम्पी प्रतिबंधक 2000 लसी द्या प्रकाश पाटील यांची शासनाकडे मागणी. * _
______________________________
डोंगरगाव (प्रतिनिधी )आर आर पाटील सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर गाईंवर लम्पी आजाराची मोठ्या प्रमाणात लक्षणे दिसून येत आहेत शेतकऱ्यांचे पशुधन समजल्या जाणाऱ्या बऱ्याच गाईं ल म्पी आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या आहेत संपूर्ण शिंदखेडा तालुक्यासह खलाने गटातही डोंगरगाव कंचनपुर वालखेडा वाघाडी बाभळे सर्वे वायपूर खलाने चांदगड आदी सर्वच गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात लंम्पि आजाराचे लक्षणे गायींवर दिसून येत आहेत
यासंदर्भात शिंदखेडा तालुका पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून प्रकाश पाटील यांचे बोलणे झालेले असून ते फक्त पाचशे लसी देणार असल्याचे समजले परंतु यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून शासनाने तात्काळ दखल घेऊन मोठ्या प्रमाणात ल म्पी लसींचा पुरवठा तात्काळ करावा व खलाणे गटासाठी 2000 लंपी प्रतिबंधक लसींची व्यवस्था करावी जेणेकरून जास्तीत जास्त गायींचा प्राण वाचवता येईल म्हणून शासनाने शिंदखेडा तालुक्यातही प्रत्येक गावात जास्तीच्या लंपि आजाराच्या लसी तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी शासनाकडे केली आहे







