शेतकऱ्यांचे पांढरे सोने झाले काळे
त-हाडी व परिसरात रिमझिम पावसामुळे कापसाची हानी
त-हाडी (प्रतिनिधी) राब राब राबूनही अनेक पीकांचे उत्पन्न आले नाही. कापसाला मिळणाऱ्या भावापेक्षा खर्च जास्त झाला आहे. रिमझिम पावसामुळे अनेक पीके हातची वाया गेली आहेत. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कापूस सडू लागला असून त-हाडी व परिसरातील शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास आता वाया जात आहे. कापसाची बोंडे अतिशय काळी पडल्याने आता क्विंटलला
केवळ तीन ते चार हजार रूपये भाव मिळत आहे.
मिळणाऱ्या भावापेक्षा मजूरीचा खर्च जास्त लागत आहे. कापूस वेचणीला दोनवेळा मजूरी लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे यावर्षी चांगला पाऊस पडल्याने
या उमेदीने शेतकरी राजा शेतात राब राब राबला. महागडी खते, बियाणे, फवारणी, कोळपणी इत्यादी मशागत केली. मात्र या मेहनतीवर आता पाणी फिरतांना दिसत असून शेतकऱ्यांचे पांढरे सोने काळे पडू लागले आहे.
हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी कर्जाच्या संकटात सापडला आहे. शेतात जेवढा खर्च केला आहे तेवढा खर्चही निघणे यावर्षी कठीण झाले आहे. कापूस नगदी पिक मानले जाते. या उद्देशाने
परिसरात कापसाची लागवड मोठया प्रमाणात केली जाते. या मुख्य पिकावर शेतकरी वर्ग वर्षभर अवलंबून असतो. या वर्षी कापूस लागवड जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाली होती. आता या कापसाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. संततधार पावसामुळे कापसाची बोंडे काळी पडून कापूस लाल पडत आहे. पहिल्याच
वेचणीत कापूस निम्मा खाली झाला आहे. परिसरात दमदार पाऊस झालेला नाही ,दुसरे पीक घेणेसुद्धा कठीण झाले आहे, अ. नदी-नाल्यांना पूर रब्बी हंगाम पुढे कसा येईल? हे सांगणे कठीण आहे. शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे.
मुग, उदीड, कांदा गेले वाया
मूग उडीद कांदा हे पीक ९० दिवसाचे असते. मात्र यावर्षी मृग नक्षत्रात उडदाची, मुग पेरणी कांदा लागवड झाली मात्र मधल्या काळात दोन तीन महीने पाऊस, आल्यामुळे या पिकाची वखरणी करण्यात आली.







