डॉ. कु. क्षितिजा रमाकांत सूळ एम डी एस डिग्री प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
नातेपुते श्रीकांत बाविस्कर
मोरोची तालुका माळशिरस येथील धनगर आरक्षण समितीचे महाराष्ट्र् राज्य अध्यक्ष हनुमंत सूळ यांची पुतणी डॉ. कु. क्षितिजा रमाकांत सूळ या १९ सप्टेंबर २०२२ रोजी लागलेल्या निकालात एम डी एस डिग्री प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांचे बी डी एस, एम डी एस तात्यासाहेब कोरे डेंटल कॉलेज वारणानगर कोल्हापूर येथे झाले एम डी एस योगिता डेंटल कॉलेज रत्नागिरी खेड येथे झाले
प्राथमिक शिक्षण मोरोची येथे तर माध्यमिक शिक्षण डॉ. बा ज दाते प्रशाला नातेपुते, उच्च माध्यमिक शिक्षण शाहू कॉलेज लातूर येथे झाले मोरोची गावचे माजी सरपंच शेतकरी पुरस्कार विजेते जालिंदर देवबा सूळ यांचे बंधू रमाकांत देवबा सूळ व सारिका रमाकांत सूळ यांची डॉ. कु. क्षितिजा ही कन्या आहे व शिवछत्रपती क्रीडा कुस्ती पुरस्कार विजेता महाराष्ट्र शासन पैलवान उमेश हनुमंत सूळ यांचे त्या चुलत बहीण आहे
क्षितिजा यांची बहीण कुमारी आकांक्षा ही इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशन (इ अँड टी सी) पदवीधर आहे, भाऊ आकाश एम बी बी एस द्वितीय वर्ष शिकत आहे ग्रामीण भागातून प्रथमच डॉ. कुमारी क्षितिजा यांनी एम डी एस पदवी घेतली आहे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा अभिनंदनचा वर्षाव होत आहे







