नातेपुते हद्दीत लंपी रोगाचे 98 टक्के लसीकरण पुर्ण..
नातेपुते श्रीकांत बाविस्कर:
लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत मध्ये संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक…
सध्या लंपी या जनावरावरील रोगाने थैमान घातले असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या अनुषंगाने नातेपुते नगरपंचायतीच्या वतीने पशुधन विकास अधिकारी वर्ग-1 ,पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी- 1 नातेपुतेचे डॉ. श्रीमती मयुरा पाटील यांच्याबरोबर लंपी स्कीम डिसीज या विषयावर चर्चा केली. त्यावेळी डॉक्टर पाटील यांनी सांगितले की, नातेपुते शहरांमध्ये साधारणपणे 98 टक्के पशु लसीकरण झालेले आहे.
त्यामुळे नागरिकांनी भिती बाळगू नये. त्याचप्रमाणे नागरिकांनी जनावरांचे खरेदी व विक्री व्यवहार लपून करू नये. असे सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी बाधित जनावरे इतर जनावरांपासून वेगळी ठेवावीत. तसेच शेतकऱ्यांनी आपापल्या जनावरांच्या गोठ्यात स्वच्छता ठेवावी,व सायंकळी सहा ते आठ या वेळेत जनावरांच्या गोठ्यात कडू लिंबाच्या पानांचा धूर करावा. काळजी घ्यावी. असे सांगण्यात आले. त्यावेळी नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. उत्कर्षराणी पलंगे यांनी सांगितले की, नगरपंचायतीच्या वतीने शहरांमध्ये रिक्षा फिरवून लंपी रोगा विषयी प्रबोधन करण्यात आले आहे. तसेच शहरांमध्ये 98% पशु लसीकरण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही असे सांगण्यात आले. तसेच शहरातील जनावरांच्या गोठ्यामध्ये सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. व अजून सॅनिटायझेशनचे काम सुरू आहे. तसेच नातेपुते नगरपंचायत मार्फत शहरातील सर्व गोठयांमधये धूर फवारणीचे काम सुरू आहे.
असे सांगण्यात आले. सदर बैठकीसाठी नगराध्यक्ष उत्कर्षराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, मुख्याधिकारी माधव खांडेकर, बांधकाम सभापती अतुल पाटील तसेच बाळासाहेब काळे, रणवीर देशमुख , नगरसेवक रणजीत पांढरे , नगरसेवक अण्णा पांढरे ,नंदू लांडगे ,शक्ती पलंगे, व प्रदीप वनसाळे उपस्थित होते.







