कोल्हापूर ( माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल )
नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला जोतिबा दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली . नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला जोतिबाची तीन कमळ पुष्प पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा बांधली .
नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला निमित सोहन कमळातील महापूजा श्रीचे पुजारी देवराज मिटके ,अंकुश दादर्णे , बाळू सांगळे ,विजय भंडारे ,श्रीचरण झूगर यांनी बांधली . सकाळी १० वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला . उंट , घोडे ,वाजंत्री देव सेवक श्री. चे पुजारी सह नवरात्र उपासकाचा लवाजमा सहभागी झाला होता .नवरात्रोत्सवात सलग दहा दिवस हा धुपारती सोहळा निघतो .
दुसऱ्या माळेलाच भाविकांनी जोतिबा दर्शनासाठी मोठी गर्दी केली . तेल अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची गर्दी झाली होती . दर्शन मंडपमध्ये भाविकांच्या दर्शन रांगा लागल्या होत्या . दर्शन रांग नियंत्रणासाठी कोडोली पोलिस स्टेशनचे पोलिस,देवस्थान समिती चे कर्मचारी व सुरक्षा रक्षक ,जोतिबा पुजारी समितीचे कर्मचारी स्थानिक पुजारी तैनात होते . वाहन पार्किंग जागेवर खाजगी वहानाची मोठी गर्दी झाली .एस.टी. महामंडळाने जादा गाडयाची सोय केली .
कर्नाटक डेपो चाही गाडया मोठ्या प्रमाणात होत्या .तेल , नारळ मेवा मिठाई ची विक्री मोठया प्रमाणात झाली . आ .विनय कोरे यांनी जोतिबा मंदिरात भेट देवून जोतिबाचे दर्शन घेतले .मंदिरात रात्री ज्योतिर्लिंग भजनी मंडळाच भजनाचा कार्यक्रम झाला . मछिंद्र डवरी ,गजानन डवरी, विश्वनाथ डवरी यांनी डवरी गीते सादर केली . रात्री उशिरा पर्यंत भाविक दर्शनासाठी येतच होते .रात्री १२ .३० वाजता त्रिकाळ आरती करून १ वाजता मंदिराचे दरवाजे बंद केले .