आरेवाडीतील दसरा मेळाव्यास बहूजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – अनिल सुर्यवंशी
आरेवाडी येथील दसरा मेळाव्यासाठी धनगर व बहुजन समाज बांधवांनी व अठरापगड समाज बांधवांनी लोकनेते,बहूजननेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज बांधवांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री.बिरोबा बनात होणाऱ्या दसरा मेळाव्यास समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात तालुक्यातून उपस्थिती दर्शवावी असे आवाहन सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी केले आहे .
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मेळाव्यास बहुसंख्य जनसमुदाय उपस्थित राहून समाजाच्या प्रभोधनसाठी समाजाच्या आगामी मागण्या इत्यादी वर विशेष सभा अंतर्गत मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी अनील सूर्यवंशी यांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी युवा नेते अनिल हाके, आबासो भानवसे ,चंद्रकांत कोळेकर उमेश राजे अनुसे ,चंदू काळे ,जीवन कासार, शरद झंजे, अमोल सागर, शेखर रणदिवे ,संतोष शिंदे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते







