तऱ्हाडीचा सुपुत्र प्रतीकने खानदेश च्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
…..
———————————————-
त-हाडी
तऱ्हाडी येथील शेतकरी कुटुंबातील कौतिक मुकुंदा कदम यांचा नातू प्रतीक माधव कदम याला राष्ट्रीय सेवा योजनेत केलेल्या भरीव कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात “राष्ट्रीय पुरस्कार “देऊन सन्मानित करण्यात आले. तर्हाडी गावासाठी आणि खानदेशासाठी ही अभिमानाची बाब आहे.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हा सर्वोच्च बहुमान मिळविणारा प्रतिक कदम हा पहिला स्वयंसेवक आहे. त्याच्या या कार्यामुळे तऱ्हाडीच्या मातीचा सन्मान तर झालाच पण त्याने खानदेशच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे .
दिनांक 24 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिवस निमित्त हा पुरस्कार भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु महोदयांच्या हस्ते स्वीकारला.
.” नॉट मी बट यु” हे ब्रीद घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेत प्रतीक सहभागी होऊन निस्वार्थ भावनेने सेवा करायला सुरुवात करतो. आपल्या दोन वर्षाच्या कालावधीत नियमित कार्यक्रमांच्या व्यतिरिक्त, निवासी शिबिरासाठी घेतलेल्या दत्त गावात जाऊन सात दिवसात जे जे करता येईल ते ते करण्याचा तो प्रयत्न करतो. मग स्वच्छता अभियान असेल ,राष्ट्रीय साक्षरता मिशन असेल, पर्यावरण रक्षण असेल, जलसंवर्धनाची काम असल,श्रमदानाचे महत्त्व असेल,नैसर्गिक काळात आलेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन असेल अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबी समजून घेऊन आपल्या कृतीतून साकार करण्याचा प्रयत्न करतो . दुर्दैवाने त्याच्या दोन वर्षाच्या कालावधीत “कोरोना “सारख्या महारोगाने थैमान घातलं होतं .आरोग्य यंत्रणे सकट सारीच व्यवस्था डगमगलेली होती .अशा काळात केंद्र आणि राज्य पातळीवरून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना सोबत घेऊन समाज हिताची काम करण्यास आणि समाजाला मानसिक आधार देण्यासाठी प्रवृत्त करण्याचे निर्देश आले .
या संपूर्ण काळात सुरुवातीला घराबाहेर निघू न शकणाऱ्या समाजासाठी सुरक्षिततेच्या कारणासाठी प्रतीक कदम ने स्वतःच्या हाताने शिलाई मशीन वर बसून स्वतः मास्क शिऊन गरीब वस्तीत ,मजुरांना ते मोफत वाटप करून कोरोना विषयीची भीती घालविण्यासाठी आधार दिला .सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझर नसेल तर वारंवार हात धुवा असे प्रबोधन केले .बँक आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर राखण्यासाठी स्वतः स्वयंसेवक म्हणून पुढे आला. तर याच काळात प्रचंड रक्ताचा तुटवडा भासत असताना कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदाते रक्तदानास प्रवृत्त होत नसताना, आपल्या जवळच्या मित्रांना रक्तदानाचे महत्त्व सांगून सुरक्षिततेची आणि जोखमीची हमी घेत तीन वेळा रक्तदान शिबिरे करून घेतले .,आणि रुग्णांना मदत केली.
प्रतीक कदम स्वतः सर्पमित्र असल्यामुळे या काळात सार्वजनिक ठिकाणी ,मतिमंद मुलांची शाळा, जिल्हा रुग्णालय आदि ठिकानी विषारी साप पकडून रुग्णांना सुरक्षितता प्राप्त करून दिलीआणि सापांनाही वन विभागाच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.
भारत सरकारची स्किल आणि डिजिटल इंडिया योजना असो, स्वच्छ भारत अभियान असो, गरिबांसाठी जनधन योजनेचा प्रचार आणि प्रसार असो ,गरिबांसाठी घरपोच गॅस योजना असो ,मतदार यादीत नाव नोंदणी ,आधार कार्ड दुरुस्ती, बँक खाते उघडून देणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रतीक कदम ने राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून कामगिरी बजावली. 26 जानेवारी 2020 रोजी दिल्लीच्या राजपथावर प्रजासत्ताक दिन संचलन शिबिरात महाराष्ट्राचे नेतृत्व करताना” क्वान्टीजंट कमांडर “म्हणून संचलनात नेतृत्व केले. याच कालावधीत दिल्ली येथे संपन्न झालेल्या युवा सांस्कृतिक महोत्सवांमध्ये महाराष्ट्राची लावणी सादर करून सगळ्यांची मने जिंकली. सोबतीला बासरी वादन होते.
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांची हे नोंद प्रतिक ला राष्ट्रीय सेवा योजनेच्या राष्ट्रपती पुरस्कारासाठी महत्त्वपूर्ण ठरली. महाविद्यालयाच्या एकूण वाटचालीत आणि धुळे, नंदुरबार जळगाव तिन्ही जिल्हे मिळून अर्थात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वाटचालीत त्याने एक ऐतिहासिक पाऊलखून निर्माण केली. विद्यापीठाt’ राष्ट्रपती पुरस्कार’ प्राप्त करणार तो पहिला स्वयंसेवक ठरला. समस्त खानदेश वाशीयांना याचा अभिमान आहे,
प्रतीकला घडविणाऱ्या वेळोवेळी मार्गदर्शन करून संधी उपलब्ध करून देणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या महाराष्ट्र गोवा विभागाचे रिजनल डायरेक्टर डी कार्तिकेन, युथ ऑफिसर अजय शिंदे, तत्कालीन राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ.अतुल साळुंखे ,राज्य संपर्क अधिकारी संभाजी देसाई , तत्कालीन विद्यापीठाचे संचालक डॉ पंकज कुमार नन्नवरे, विद्यमान संचालक डॉ. सचिन नांद्रे, संघ व्यवस्थापक डॉ. शालिनी घुमरे पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. अधिकाऱ्यांपासून स्वयंसेवक सारख्या शेवटच्या घटकापर्यंत सगळ्यांना आनंद झाला. त्याच्या या यशाचे फिट इंडियाचे ब्रँड अँबेसिडर रणजीत सिंग राजपूत, गौरव भारद्वाज यांच्यासह तऱ्हाडी गावाचे लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर उपसरपंच उजनबाई अहिरे, ,माजी सरपंच, सुदाम भलकार माजी उपसरपंच अशोक सोनवणे, ओंकार पाटील, युवा मल्हार सेना जिल्हा उपध्यक्ष सुनिल धनगर, पोलिस पाटील प्रतापसिंह गिरासे विविध कार्यकारी सहकारी संस्था त-हाडी चेअरमन प्रशांत कंरके, व्हा चेअरमन उदय भलकार, पिक संरक्षण सोसायटी त-हाडी चेअरमन रावसाहेब कदम, व्हा चेअरमन सुभाष भामरे संस्थांचे , तापी विद्या प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष सुभाष भामरे मराठी ग्रामीण पत्रकार संघ त-हाडी मराठा कुणबी पाटील समाज संस्थापक अध्यक्ष रावसाहेब चव्हाण त-हाडी मराठी ग्रामीण पत्रकार संघ सचिव डॉ प्रा दिलवरसिग गिरासे व त्याच्या कुटुंब आणि मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे. प्रतीक कदम हा सध्या जी. टी. पाटील महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. डॉ. माधव कदम यांचा चिरंजीव असून तो सध्या एम. एस .डब्ल्यू. महाविद्यालय तळोदा येथे समाजकार्य विभागाच्या द्वितीय वर्षात शिकत आहे .जी.टी. पाटील महाविद्यालय व एम एस डब्ल्यू महाविद्यालयाचे संस्था चालक, प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी व प्राध्यापक वर्ग यांनीही अभिनंदन केले आहे.







