आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांच्या बद्दल गैरसमज पसरू नये : राजकुमार हिवरकर पाटील, धैर्यशील मोहिते पाटील हे समाजाची दिशाभूल करत आहेत :
नातेपुते प्रतिनिधी :
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याबाबत वेगवेगळ्या विरोधी व स्वकिय पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून वारंवार बदनामीचे षडयंत्र चालू आहे, तानाजी सावंत यांना आरोग्य मंत्री पद मिळाल्यापासून विघ्नसंतुष्ट लोक वारंवार आरक्षणाबाबत मराठा समाजाविषयी गैरसमज पसरवत आहेत
वास्तविक पाहता ते सुद्धा मराठा समाजाचे आहेत हे टीकाकार विसरतात मराठा समाजाला आरक्षण हे कायदेशीर मार्गाने मिळावे यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत यासाठी स्वतः आरोग्य मंत्री तानाजी सावंत व मंत्रिमंडळातील सर्व सहकारी प्रयत्न करीत आहेत तानाजी सावंत मंत्री महोदय ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांचे बोलणे हे अर्थानुसार बदलते जसे की आमदार शहाजी बापू पाटील यांची बोलीभाषा, माजी मंत्री रावसाहेब दानवे यांची बोलीभाषा आहे त्याचा विरोधक व स्वकीय पक्षांनी गैर अर्थ काढू नये असे शिंदे गटाचे, माळशिरस तालुका शिवसेना प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी नातेपुतेे येथे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की जर मंत्री तानाजी सावंत यांचा समाजाला विरोध असता तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जवळपास ४७ कुटुंबानी आपल्या घरातील कर्ता पुरुष गमावला आहे त्या सर्वांच्या कुटुंबाला तानाजी सावंत यांनी प्रत्येकी एक लाख रुपये मदत केली आहे मंत्री तानाजी सावंत यांच्या आठ साखर कारखान्यामध्ये जवळपास २४ हजार समाजातील व इतर समाजातील मुलांना नोकऱ्या दिल्या त्यांचा ते आधारवड बनले आहेत हे सुद्धा विरोधकांनी लक्षात ठेवले पाहिजे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्यमंत्री पदाची धुरा घेतल्यापासून त्यांनी पुणे येथील ससून रुग्णालयाची तसेच दीनानाथ मंगेशकर या मोठ्या हॉस्पिटलला भेटी देऊन तिथे चालू असणारा कारभार सुधारला व रुग्णांना न्याय दिला हे पण पूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे तानाजी सावंत यांनी माता सुरक्षित तर घर सुरक्षित हा उपक्रम त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात राबवून नवरात्र महोत्सव निमित्त स्त्रीशक्तीचा सन्मान केला हे अभियान राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे,हे सुद्धा विरोधकांनी लक्षात घेतले पाहिजे
मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे ते कायदेशीर चौकटीत बसून द्यायचे आहे मागच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण दिले त्याच्या दोन बॅच नोकरीमध्ये सुद्धा गेल्या सरकारमध्ये समाविष्ट झाल्या परंतु आघाडी सरकारने कोर्टात आरक्षण टिकवले नाही आता तसे होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री मंडळ आरक्षण कायदेशीर टिकेल अशा स्वरूपाचे पुरावे कोर्टात देणार आहे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी व एस सी एस टी यांच्या आरक्षणाला धक्का न लावता ते दिले जाईल
धैर्यशील मोहिते पाटील हे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या बोलीभाषेचा गैर अर्थ काढून मराठा समाजाची दिशाभूल करीत आहेत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून त्यांना काय साधायचे आहे हा संशोधनाचा विषय कारण आपण मित्र पक्षाच्या मंत्र्यावर टीका करत आहात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तानाजी सावंत यांच्या विषयी आपली भूमिका मांडलेली आहे हे लक्षात घ्यावे आघाडीचा धर्म पाळावा असेही हिवरकर पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे,







