डोंगरगाव येथे आरोग्य विभागाचा “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” कार्यक्रम संपन्न. *. _
_______________________________
डोंगरगाव ( प्रतिनिधी )
आर आर पाटील_ दि’ 29 सप्टेंबर 2022 रोजी अंगणवाडी इमारतीत जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या” माता सुरक्षित तर घर सुरक्षित “या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले दिपप्रज्वलन लोकनियुक्त सरपंच सुवर्णा पाटील यांनी केले
या दिवशी आरोग्य सेवक सूयोग पिंगळे यांनी गरोदर पणातील काळजी गरोदर मातांच्या विविध शासकीय योजनांचा लाभ समतोल व सकस आहाराचे महत्व व्यसनमुक्ती सुरक्षित मातृत्व व त्याच्या उपाय योजना यावर उपस्तीत गरोदर महिलांना सविस्तर माहिती दिली प्रकाश पाटील यांनी आरोग्याचे महत्व यावर विवेचन केले
या दिवशी महिलांनी व बचत गटाने विविध प्रकारच्या अनेक सकस आहाराचे व कडधान्याचे स्टॉलही लावलेले होते या दिवशी प्रकाश पाटील यांच्यासमवेत लोकनियुक्त सरपंच सुवर्णा पाटील माजी सरपंच अशोक पाटील उपसरपंच संजय पाटील पत्रकार आर आर पाटील एस ए पाटील पांडुरंग कोळी गणेश पाटील ऑपरेटर ग्रामसेविका जयश्री पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील बहुसंख्य महिला आशा सेविका साधना पाटील अंगणवाडी सेविका सौ पाटील प्राथमिक शाळेतील शिक्षिका गावातील सर्व गरोदर महिला आरोग्य सेवक सुयोग पिंगळे आरोग्य सेविका एम एम पाटील इ उपस्थित होते







