• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

झेंडू उत्पादक शेतकऱ्यांची दसरा -दिवाळी होणार गोड……. ८० ते १०० रुपये किलो झेंडूला भाव

माणगंगा by माणगंगा
October 2, 2022
in महाराष्ट्र
0
झेंडू उत्पादक शेतकऱ्यांची दसरा -दिवाळी होणार गोड……. ८० ते १०० रुपये किलो झेंडूला भाव

झेंडू उत्पादक शेतकऱ्यांची दसरा -दिवाळी होणार गोड

८० ते १०० रुपये किलो झेंडूला भाव

त-हाडी. :- मागील काही दिवसापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आलेला आहे. मागील दोन वर्षात कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र कडक लाॅकडॉऊन असल्या कारणाने लग्न समारंभ, तसेच मंदिरे बंद करावी लागली होती,पण गेली काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्याने लग्न समारंभ, मंदिरे खुले झाल्याने त्यावर आधारित शेतीमालासह रोजगारही उपलब्ध झाल्याने व अनेक देवस्थानांची मंदिरे खुली झाल्याने यावर्षी काही प्रमाणात झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाने साथ दिल्याने त्यांची या वर्षीची दसरा -दिवाळी आनंदात साजरी होणार असल्याचे दिसून येत आहे.


शेतकरी आपल्या शेतीत दरवर्षी वेगवेगळे प्रयोग करून चार पैसे मिळतील अशी पिके घेण्याचा प्रयत्न करत असतो तसेच पारंपरिक शेतीला फाटा देत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून बघत असतो. शिरपूर तालुक्यात काही शेतकरी झेंडू शेतीकडे वळले आहेत.

दसरा -दिवाळी सणाच्या उत्सवासाठी दरवर्षी जुलै महिन्यात झेंडू बेण्याची लागवड करतात. परंतु गेल्या काही वर्षात निसर्गाच्या अस्मानी सुलतानी संकटांमुळे दसरा -दिवाळी सणाच्या वेळेस पाऊस पडून झेंडूचे आतोनात नुसकान झाले तर काही शेतकऱ्यांची झेंडूची फुले हजारो रुपये गाडी भाडे करून बाहेर जिल्ह्यात बाजारात विक्रीसाठी नेली होती. मात्र एकही व्यापारी खरेदी करण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव झेंडूचे शेकडो किलो फुले रस्त्यावर फेकून दिली होती. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला होता.

परंतु या वर्षी शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केल्यापासून पाऊस सुरू असून अशा वातावरणात शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन झेंडूचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना दसऱ्याच्या पहिल्या टप्प्यात चांगले पैसे मिळत असून दिवाळीच्या सणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ही चांगले उत्पादन मिळून चार पैसे मिळण्याची आशा आहे .


शिरपूर तालुका सह परिसरातील गावांमध्ये झेंडूचे उत्पादन चांगले निघणार असल्याने झेंडू खरेदी करणारे व्यापारी घरपोच येऊन झेंडू उत्पादक शेतकऱ्याकडून ८० ते १०० रुपये किलो भावाने झेंडूचे फुले खरेदी करून घेऊन जात आहेत त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांची या वर्षीची दसरा -दिवाळी आनंदात साजरी होणार असल्याने झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

चौकट:-

दसरा- दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखता प्रकाश व झेंडूच्या फुलांची सजावट शेतकऱ्याच्या पिवळ्या सोन्याचे भरभराटीचे दिवस, त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

प्रतिक्रिया

मी वीस गुंठे क्षेत्रावर झेंडू फुलांची लागवड केली असून आतापर्यंत वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च आला असून झेंडू पिकामध्ये आंतरपीक म्हणून कृषी विभागाकडून मिळालेल्या परसबाग भाजीपाला बियाण्याची लागवड केलेली आहे ,निसर्गाने व वातावरणाने साथ दिल्याने यावर्षी झेंडू उत्पादन चांगले होण्याची अपेक्षा आहे. मागील एक-दोन वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे झेंडूची शेती धोक्यात आली होती. परंतु आता यावर्षी चांगला भाव मिळून दसरा दिवाळी गोड होईल असं दिसून येत आहे.

रावसाहेब भामरे
झेंडू उत्पादक शेतकरी
ता.शिरपुर

Views: 257
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
प्रा.सौ.राणी खराडे – देशमुख यांचे आकस्मित निधन

प्रा.सौ.राणी खराडे – देशमुख यांचे आकस्मित निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)