राजेवाडीतील श्री श्री सद्गुरू कारखान्याने शेतकऱ्यांना ऊस दरात फसविले –
उसबीलाची उर्वरित रक्कम द्यावी अन्यथा आंदोलन -बळीराजा शेतकरी संघटना
आटपाडी तालुक्यातील राजेवाडीतील श्री श्री सद्गुरू साखर कारखान्याचे शेतकऱ्यांना ऊस दारात गंडवले आहे. याबाबत बळीराजा शेतकरी संघटनेने कारखान्याच्या मॅनेजमेंट ला निवेदन दिले आहे
या निवेदनात म्हटले आहे की सन 2021- 22 या गळीत हंगामामध्ये कारखान्याने 2660 दर जाहीर केला होता .पण आज रोजी कारखान्याने शेतकऱ्यांना 2437 रुपये दर दिला आहे. ज्या ऊस उत्पादकाने श्री श्री सद्गुरु रविशंकरला कारखान्याला ऊस घातलेला आहे. त्यांना अजून कारखाना 223 रुपये दर देणे बाकी आहे.
त्यामुळे बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आज पुन्हा निवेदन देण्यात आलेला आहे की उसाचा गाळप हंगाम सुरू होण्या अगोदर 223 रुपये अधिक 300 रुपये मॉलिसिस बागेस व वीज असे मिळून 523 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्या अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक 14 /10 2022 रोजी कारखान्यावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल
कारखान्याने परवा प्रेस नोट काढून त्यामध्ये 17/ 3/ 2022 शासनाने साखर आयुक्ताने शासन अध्यादेश काढलेला होता तो अध्यादेश सन 22- 23 या हंगामासाठी तो लागू आहे .पण कारखाना प्रशासन भाहदराने 20 -21 ला लागू केलेला आहे. याचा अर्थ चेअरमनला तपासण्याची वेळ आलेली आहे .असा याचा अर्थ होतो तरी त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्याची उर्वरित रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी अन्यथा ऊस उत्पादक शेतकरी उग्र होऊन कारखाना बंद पाडल्याशिवाय राहणार नाहीत. यावेळी डॉक्टर दिगंबर मोरे,जयंत गायकवाड,धनाजी लोहार,प्रकाश कांबळे,रामचंद्र साठे
मनोज शिरकांडे व कार्यकर्ते उपस्थित होते







