बालकलाकार आर्यन विलास पाटील याला राज्य सरपंच सेवा संघाचा “बाल युवारत्न” पुरस्कार जाहीर
महाराष्ट्रातील विविध जिल्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने सामाजिक, शेतकरी चळवळ, सहकार, शिक्षण कला, कृषी, पत्रकारिता, अंध,अपंग, या व्यक्तींना महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने विशेष पुरस्काराने गौरविले जाते. त्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षात कलेची निरंतर सेवा करत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ६५ पुरस्कार मिळवणाऱ्या बालकलाकार आर्यन विलास पाटील याला क्रांतीदिनी म्हणजेच ९ ऑगस्ट २०२१ रोजी कोल्हापूर येथे केशवराव भोसले सभागृहात होणार्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात बाल युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
चिपळूण तालुक्यातील परशुराम (दुर्गवाडी) येथील बालकलाकार हा एस पी एम परशुराम शाळेत ७ वीत शिकत आहे.
आतापर्यत या बालकलाकाराने पाच लघुपट, दोन अल्बम सॉंग, आणि दोन चित्रपटात काम केले आहे.
दिग्दर्शक गुरु, श्री शिवाजी मालवणकर, लेखक श्री नंदा आचरेकर आणि संपूर्ण चित्रकारच्या टीम व आई वडील यांचे आर्यनच्या या अपूर्व यशात मोलाचे योगदान आहे.
नुकताच त्याला आदर्श बालगौरव विशेष गुणरत्न किड्स अचिवर्स आयकॉन अवार्ड मिळाला आहे, तसेच बुलढाणा फिल्म सिटी तर्फे दिला जाणारा देशातील मानाचा राष्ट्रीय कलागौरव पुरस्कार देखील मिळाला आहे. आणि रत्नसिंधू कोकण विभाग कलामंच महाराष्ट्र यांचेकडून रत्नसिंधू प्रज्ञा गौरव पुरस्कार मिळाला आहे.
तसेच मॅजिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे..
या पुरस्काराबद्दल माजी लोकप्रिय आमदार श्री सदानंद चव्हाणसाहेब,चिपळूणचे आमदार श्री शेखर निकम सर, उद्योजक श्री अजय मेहता, जिल्हा परिषद सदस्या सौ दिप्ती महाडिक, पंचायत समिती सदस्या सौ ऋतुजा पवार, दुर्बिण ग्रुप-लोटे, दिग्दर्शक श्री शिवाजी मालवणकर, लेखक श्री नंदा आचरेकर, माजी पंचायत समिती सदस्य श्री अभयदादा सहस्त्रबुद्धे, परशुराम एस पी एम शाळेचे मुख्याध्यापक श्री केंजळे सर, सौ कुलकर्णी मॅडम व सर्व शिक्षकवर्ग, मराठी शाळा परशुरामच्या मुख्याध्यापिका सौ माळी टीचर यांनी बालकलाकार आर्यनचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.