*कुसमोड येथील *लाभार्थ्यांना वसंतराव नाईक भटक्या जाती व जमाती महामंडळामार्फत वीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज योजना मंजूर. माननीय धैर्यशीलजी (भैय्यासाहेब* ) मोहिते पाटील
विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-


कुसमोड तालुका माळशिरस येथील गोरगरीब लोकांना लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारणा म्हणून थेट बिनव्याजी एक लाख रुपये कर्ज योजना महाराष्ट्र शासन वसंतराव नाईक भटक्या जाती व जमाती महामंडळामार्फत वैयक्तिक एक लाख रुपये असे वीस लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे भाजपा संघटन महामंत्री माननीय धैर्यशील जी मोहिते पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सतीश होनमाने सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा माळशिरस तालुका पोपट कचरे ग्रामपंचायत सदस्य देविदास धायगुडे अनिल धायगुडे यांनी पाठपुरावा करून मंजूर करण्यात आली.
सदर योजनेमध्ये कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम लोगो उद्योग व मध्यम उद्योग हे व्यवसाय करण्यासाठी व त्यांचे आर्थिक सुधारणा होण्यासाठी कुसमोड मधील वीस लाभार्थ्यांना सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय शंभरकरजी साहेब तसेच तसेच महामंडळाच्या व्यवस्थापिका सौ काळे मॅडम यांच्या द्वारे निवड समितीद्वारे मंजूर करण्यात आली.
सदर योजना मंजूर करण्यासाठी डॉक्टर उत्तमराव सरगर साहेब (भाजपा शक्ती केंद्र प्रमुख) ,बाळासाहेब धायगुडे ग्रामपंचायत सदस्य ,महादेव बंडगर ,नारायण चव्हाण ,रमेश देशमुख ,विकास सरगर पाटील, शशिकला लोखंडे माजी सरपंच, चंद्रकांत पवार ,दादासाहेब पवार, अरुण पवार ,विलास लोखंडे, जगदीश गायकवाड, बाळासाहेब कपने ,दिगंबर चौगुले ,सुनील बोडरे ,बापू बोडरे ,अक्षय मोरे, नितीन लेंगरे ,नबाजी मदने, काळभोर दादा ,इत्यादींचे सहकार्य लाभले.







