कोल्हापूर ( माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल )
. क्षेत्र जोतिबा डोंगरावर पहिला पालखी सोहळा मोठया धार्मिक उत्साहात पार पडला . खंडेनवमी निमित्त दिवे ओवाळणी ,शस्त्र पुजन , घट उठविणचा विधी पार पडला .
जोतिबा डोंगरावर पहाटे सुर्योदयापूर्वी दिवे ओवाळणी चा धार्मिक विधी झाला . तांदळाच्या पीठाचे दिवे ओवाळण्याची परंपरा अजुन टिकून आहे .कृष्ण रूपात महापूजा बांधली . मंदिरात शस्त्र पुजनाचा विधी झाला .
मंगळवारी सकाळी ९ वाजता खंडेनवमी निमित उंट , घोडे ,वाजंत्री , देव सेवकाच्या लवाजम्यासह श्री .जोतिबा देवाचा पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी निघाला . स्थानिक पुजारी व भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करून चांगभलं चा गजर केला .
पोलिस बँडची धुन लक्षवेधी ठरली. जोतिबा हक्कदार पुजारी समितीने पोलिस बँडची मागणी केली होती .
जिल्हा समादेश संदिप दिवाण, उपसमादेश पुरुषोत्तम पाटील , निवृत्त डीवायएसपी आर .आर. पाटील यांचे सहकार्य लाभले .ढोल , तुतारी , डवर , झांजपथक ,कैंचाळच्या आवाजाने मंदिर परिसर दुमदुमून गेला .ढोलीची झुलवे ,डवरीची डवरी गीते , म्हालदाराची ललकारी झाली . पालखी समवेत श्रीचे मुख्य पुजारी गजानन उपारे ,मानाचे समस्त दहा गावकर, देव सेवक , देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, जोतिबा मंदिर कार्यालय प्रभारी दिपक म्हेत्तर , सरपंच राधा बुणे , सिंधिया ग्वाल्हेर संस्थानचे प्रभारी अजित झूगर, कोडोलीचे सपोनि शीतलकुमार डोईजड होते . सचिव शिवराज नाईकवाडे यांनी तोफेची सलामी दिली .
तोफेच्या सलामी ने पालखी सोहळ्याची सांगता झाली . सकाळी १० वाजता धुपारती सोहळ्याने जोतिबा , यमाई , तुकाई , भावकाई मंदिरातील घट उठविण्याचा विधी झाला. सडा रांगोली, पाय पुजनाने धुपारतीचे स्वागत करण्यात आले . महिलांनी सुगंधी दुध वाटप केले .कर्पुरेश्वर तीर्थ कुंडात दिवा सोडण्याचा विधी झाला . दुपारी १ . ३० वाजता परत जोतिबा मंदिरात धुपारतीची सांगता तोफेच्या सलामी ने झाली . अंगारा वाटप करून नवरात्र उपवासाची सांगता झाली .