आढे पुनर्वसन गावात वाचनालयासाठी जागा द्या
लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निवेदन देऊन मागणी.
त-हाडी
लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय,आढे ता.शिरपूर या संस्थेचा स्थापनेला १३ वर्ष पूर्ण झाले आहेत.ग्रा.पं.कार्यालय येथे वारंवार पत्रव्यवहार व निवेदन देऊन मागणी केली.तरी ग्रामपंचायत कार्यालयाकडून आजपर्यंत जागा मिळालेली नाही. सन २०१२/२०१३ ला राज्य ग्रंथालय संचनालयाकडून वाचनालयाला शासनमान्यता मिळाली आहे.
स्थापनेपासून शासकीय ग्रंथालय कार्यालय,धुळे यांच्या नियमानुसार अखंडितपणे गावात वाचकांना सेवा पुरवीत आहे.ग्रामपंचायत-आढे येथील सभेत/ग्रामसभेत ठराव करण्यात यावा अशी मागणी संस्थेचा वतीने सरपंच मनोहर पारधी व ग्रामसेवीका जयश्री पाटील यांच्याकडे वाचनालयाचे उपाध्यक्ष अजितसिंग राजपूत व ग्रंथपाल दक्षा गिरासे यांच्याकडून निवेदन देऊन मागणी करण्यात येत आहे.
मा.जिल्हाधिकारी सो.धुळे यांच्याकडून दिनांक ७/४/१९८९ चा आदेशान्वये मौजे-आढे गाव पुनर्वसन म्हणून आदेश पारित केले आहेत.नवीन जागेत गाव स्थलांतर होत आहे.पुनर्वसित गावात वाचनालयासाठी जागेची मागणी दिनांक:-१४/४/२०१५,विषय नं.२ चा सभेत व दिनांक:-२४/५/२०१७,विषय नं.३ चा सभेत आणि दिनांक:-१३/११/२०१९,विषय नं.२ चा सभेत,त्यानंतर पुन्हा दिनांक:-१२/६/२०२२विषय नं.३ चा सभेत त्यावेळचे तत्कालीन सरपंच,ग्रामसेवक व आताचे सरपंच,ग्रामसेवक यांच्याकडे वाचनालयासाठी १ हजार चौ.मी.जागा देण्यात यावी.अशा प्रकारची मागणी कार्यकारी मंडळाचा सभेत ठराव करून सर्वानुमते चौथ्यांदा मागणी करण्यात येत आहे.
गावातील वाचक वर्गाला व विध्यार्थ्यांना चांगली अभ्यासाची जागा व स्वतंत्र कार्यालय झाल्यास गावातील स्पर्धा परीक्षेचे विध्यार्थी,सुशिक्षित पुरुष,महिला,जेष्ठ नागरिक यांना वाचनालय चा चांगला फायदा होईल.अशा प्रकारची मागणी संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.







