• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

इंटरनेटच्या जमान्यातही पुस्तकच ठरणार भारी-वाचकांच्या प्रतिक्रिया वाशी येथे कविता, कथा व पुस्तकांचे प्रकाशनडॉ सुरेश राठोड

माणगंगा by माणगंगा
October 7, 2022
in महाराष्ट्र
0
इंटरनेटच्या जमान्यातही पुस्तकच ठरणार भारी-वाचकांच्या प्रतिक्रिया वाशी येथे कविता, कथा व पुस्तकांचे प्रकाशनडॉ सुरेश राठोड

इंटरनेटच्या जमान्यातही पुस्तकच ठरणार भारी-वाचकांच्या प्रतिक्रिया वाशी येथे कविता, कथा व पुस्तकांचे प्रकाशनडॉ सुरेश राठोड

कोल्हापूर प्रतिनिधी: सामाजिक जीवनाचे नाते अधिक घट्ट करण्याचे काम कथासंग्रह आणि कवितासंग्रहाच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे पुस्तके आपल्या आयुष्यात दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शक ठरतात. ती चांगल्या गोष्टींची जाणीव करून देत, जीवन प्रकाशमान करतात. प्रत्येकाच्या जीवनात पुस्तकाचा परिस्पर्श झाला तर त्यांचे
जीवनमान उंचावते.

म्हणूनच पुस्तके जीवन परिवर्तनाचे काम करीत असतात. आता इंटरनेटचा ऑनलाइन जमाना असला तरी पुस्तकाचे महत्व त्यापेक्षाही अधिक पटीने जास्तच आहे. असा सूर वाशी येथील रत्नदीप मंगल कार्यालयात नुकताच घुमला. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो, पूर्वी पुस्तक दिसत होते, पुस्तक हेच उत्तम मार्गदर्शक आहे. ते आपल्या जीवनात गुरु प्रमाणे दिशा देत असते म्हणून आजही पुस्तकाला तोड नाही, अशा प्रतिक्रिया याप्रसंगी उपस्थित असलेल्या अनेक वाचकांनी व्यक्त केल्या. त्यामुळे हा सोहळा लक्षवेधी ठरला. या भागात असा प्रथमच कार्यक्रम झाल्यामुळे सर्वत्र तो कौतुकाचा विषय ठरला.

आई महालक्ष्मीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या करवीर नगरीतील वाशी येथील रत्नदीप मंगल कार्यालय मध्ये गोकुळ सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कै.रंगराव पाटील (रेंदाळकर) वास्तववादी, नाती व निसर्गावर आधारित कविता संग्रह व पांडुरंग सुभान कांबळे (नंदवालकर) लिखित आजच्या वास्तविक तरुणांच्या जीवनावर आधारित, आजची तरुणाई कथासंग्रह, विश्व प्रेमाचे कवितासंग्रह अशा पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे दैनिक पुढारी चे कार्यकारी संपादक श्रीराम पचिंद्रे, प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ जे.के.पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष गोकुळ सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष विश्वासराव पाटील, उदयसिंह पाटील कौलकर व रावसाहेब पाटील रेंदाळकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व साहित्य प्रकाशन करण्यात आले.

यावेळी दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक श्रीराम पचिंद्रे म्हणाले, साहित्य हा समाज परिवर्तनाचा आरसा आहे, तो मानवी मनावर नियंत्रण ठेवतो. यानंतर प्राचार्य डॉ. जे.के. पवार यांनी पुस्तकांबद्दल माहिती दिली. यानंतर गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, आजच्या काळात साहित्य संस्कृतीला बळ देण्याची गरज आहे. राम मोहिते व रावसाहेब पाटील रेंदाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यानंतर संयोजक राजवीर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका व्ही.एस. सरनोबत, एस.बी.बर्गे, एम एस पाटील यांचा पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व स्वागत बी ए पाटील यांनी केले. निवेदन बी एस कांबळे सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन श्रीराम ज्ञानपीठ, राजवीर पब्लिक स्कूल व श्रीराम सहकार समूह यांनी केले.

Views: 133
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
दत्तोबा संस्थानातील सार्वजनिक शौचालय बांधकामाची सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याकडून पाहणी

दत्तोबा संस्थानातील सार्वजनिक शौचालय बांधकामाची सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याकडून पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)