त-हाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू मृत्यू
त-हाडी प्रतिनिधी :
शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील त-हाडी शिवारातिल माधव सोनु बागुल यांच्या शेतातील वासरू बिबट्याने वासरू ठिकठिकाणी लचके तोडून मृत्युमुखी पाडल्या ही घटना शुक्रवारी ( दि ७)मध्यरात्रीच्या सुमारास घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की त-हाडी येथील त-हाडी शिवारात राहणारे माधव सोनु बागुल शिवारातील गट नंबर ३४/१ मध्ये गाय वासरू दिवसभर चारुन रात्रीला शेतात बांधुलेले होते .
माधव सोनु बागुल व भुषण बागुल हे दोघे जण रात्रीला जेवण करून गाय वासरू जवळ असलेल्या शेतात होते.परंतु रात्रभर रिमझिम पाऊस सुरू असल्याने शेतात बिबट्या केव्हा शिरले हे त्यांच्या लक्षात आले नाही.सकाळी चार वाजेच्या सुमारास नित्यनियमना प्रमाणे माधव सोनु बागुल व भुषण बागुल बसवलेल्या गाय वासरू बघण्यासाठी गेले असता बिबट्यानी कापसाच्या शेतातुन आत प्रवेश केला बांधलेल्या बसवलेल्या गाय वासरू जवळपास वासरू ठिकठिकाणी लचके तोडून मृत्यूमुखी पडल्याचे निदर्शनास आले. भुषण बागुल यांनी सदरील घडलेल्या घटनेची माहिती त-हाडी तलाठी,वनविभागाचे अधिकारी व येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना माहिती दिली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ ओझरकर प्रशांत लांडगे वनपाल पी ए पाटील,वन विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन घडलेल्या घटनेचा पंचनामा केला
सदरील घटनेत शेतकरी माधव सोनु बागुल व भुषण बागुल यांचे चालू भावाप्रमाणे जवळपास वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहेत . सदरील वासरू झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्याची मागणी सरपंच जयश्री धनगर उपसरपंच उजनबाई अहिरे पोलिस पाटील प्रतापसिंह गिरासे आदींनी केली आहे.







