त-हाडी शिवारात बिबट्याचा कहर सुरुच,रात्री गायीचा तर दिवस बकरीचा पाडला फडशा,परिसरात भीतीचे वातावरण
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील त-हाडी शिवारातील तापी नदी किनाऱ्यावर बिबट्याने कहर माजवला असून शनिवारी पहाटे गायीचा फडशा पाडून दुपारी बकऱ्यांच्या काळपावर हल्ला केल्याने एका बकरीचा फडशा पाडल्याची घटना घडल्याने तऱ्हाडी परीसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने बिबट्या चा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शिरपूर तालुक्यात गेल्या दोन अडीच वर्षांपासून तापी नदी काठावरील थाळनेर,मांजरोद,टेकवाडे, उंटावद,खर्दे,अंतुर्ली,तऱ्हाडी आदी भागात बिबट्याचे वास्तव्य आढळून आले असून अनेक पाळीव प्राण्यासह जंगली प्राण्यांचा जीव घेतला आहे.मात्र एकाच दिवशी दोन पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याची घटना तालुक्यातील तऱ्हाडी येथे घडल्याने नागरिक व भयभीत झाले आहे.तालुक्यात आतापर्यंत फक्त पायांच्या ठश्यावरून वास्तव्य असल्याचे समोर आले होते मात्र बकऱ्या चारणाऱ्या व आणि स्वतःच्या बकरीचा बिबट्याने फडशा पडलेल्या तऱ्हाडी येथील रहिवासी याने बिबट्याला बकरी ओढून नेताना पाहिले असल्याचा दावा केल्याने व परिसरात आणि घटनास्थळी बिबट्याचेच ठशे आढळून आल्याने शेतकरी शेतमजूर आणि ग्रामस्थ भयभीत झाले आहेत .त्यामुळे वनविभागाने सापळा रचून उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.







