पळासनेर उपसरपंचपदी राजू भील
पळासनेर ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंचपदी शीतल कोळी निवडून आले. तर उपसरपंचपदी राजू भील यांची सोमवार (ता. 10 ) बिनविरोध निवळ झाली.पळासनेर (ता. शिरपूर) येथील ग्रामपंचायत किर्यालयात उपसरपंच पदाची निवडणूक झाली. लोकनियुक्त शीतल कोळी यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली, उपसरपंच पदासाठीच्या या निवडणूकीत सत्ताधारी गटाने अर्ज दाखल केला नाही.
त्यामुळे उपसरपंचपदी छोटूकोळी यांच्या पॅनलचे राजू भील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. म्हणून राजू भील बिनविरोध निवडून आले. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भगवान पाटील यांनी काम पाहीले. निवडीनंतर सरपंच-उपसरपंचाचा व सदस्याचा सत्कार छोटू कोळी, राहूल पाटील, योगेश राजपूत ,शिवा चारण व ग्रामस्थांनी केला.
पळासनेर : ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजू भील यांची निवड झाल्यानंतर सत्कार करतांना सरपंच शितल कोळी, पॅनलप्रमुख छोटू कोळी, सदस्य पदअधिकारी ग्रामस्थ.







