बंकटस्वामी विद्यालयातील विद्यार्थ्यांची व विद्यार्थिनींची झाली आरोग्य तपासणी
श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेच्या बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट येथील विद्यालयात सिव्हिल हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी आज दिनांक 13 /10 /2022 गुरुवार रोजी ठीक 1.00 वा. आरोग्य तपासणी केली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर यांनी डॉ. रमेश गुंजाळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
त्यांच्या समवेत आलेल्या डॉ.स्नेहल गोसावी तसेच रोहिणी गुजर यांचे स्वागत वर्ग 10 च्या विद्यार्थिनींनी केले. नंतर वर्ग पाचवी ते वर्ग दहावी पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक श्री उंदरे सर श्री रामहरी रिंगणे सर श्री संकेत सुपेकर सर श्री अशोक आनेराव सर तसेच श्री महेश मोरे सर श्री संजय बनसोडे सर श्री सुरेश भोसले श्री बाबुराव कानडे श्री कल्याण अनंत्रे कर्मचारी उपस्थित होते.







