जिल्हा परिषद मराठी शाळा त-हाडी येथे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
त-हाडी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त अध्यक्ष तुळशिराम भामरे होते प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस पाटील प्रतापसिंह गिरासे ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील, तलाठी संतोष अहिरे सुधाकर सोनार सचिव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था त-हाडी सचिव धनराज कंरके पिक संरक्षण सोसायटी त-हाडी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर भलकार, रावसाहेब चव्हाण लोकमत पत्रकार, मुख्याध्यापक गणेश पवार ज्ञानेश्वर सौदाणे क्रांती सिंग नाना पाटील ग्रंथालय संस्थापक अध्यक्ष कचरू अहिरे यांनी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यांनी मांडले. डॉ.कलामांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शाळेत वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी वैयक्तिक प्रकट वाचन व सामूहिक मूक वाचन घेण्यात आले. तसेच उत्कृष्ट वाचक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
शाळेत आज हात स्वच्छ धुवा या चांगल्या सवयीचे प्रात्यक्षिकही करून दाखवण्यात आले. ज्यात हात धुण्याची योग्य पद्धत व वेळोवेळी हात धुण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. या प्रात्यक्षिकामध्ये शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांनीही सक्रीय सहभाग नोंदवला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सहभाग नोंदवला.व आभार प्रदर्शन शशिकांत बोरसे यांनी केले







