महाराष्ट्र नवनिर्माण सेना जल जिवन योजनेवर टाकणार बहिष्कार – प्रकाश गायकवाड
आटपाडी तालुक्या मध्ये जलजीवन मिशन अतर्गत हर घर नल से जल ही योजना चालू आहे, तरी तालुक्यातील काही गावांमध्ये या योजनेचे काम पुर्ण झाले आहे, तरी त्या गावांमधील काही लोकांना या योजनेचा लाभ मिळाला नाही .
या बाबत मुख्यकार्यकारी अधिकारी सो ० जिल्हा परिषद सांगली यांना निवेदन देण्यात आले आहे की या कामाची पहाणी करून प्रत्येक कुटूंबाला या योजनेचा लाभ मिळावा असे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आटपाडी तालुक्यातील जलजीवन मिशन काम ज्या ज्या गावामध्ये झाले आहे
त्या त्या गावातील ग्रामपंचायतला घरपट्टी पाणीपट्टी भरणार्या व मतदानाचा हक्क बजावणार्या प्रत्येक नागरिकाकडून जल जीवन मिशन या योजनेला आटपाडी तालुक्यातुन बहिष्कार टाकण्यात येईल असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी सांगितले आहे .
तरी ज्या गावमध्ये या योजनेचे काम झाले आहे व याचा लाभ मिळाला नाही त्यांनी प्रकाश गायकवाड यांच्या शी संपर्क साधावा .







