वाढदिवसानिमित्त केले वृक्षारोपण
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांच्या मुलीच्या वाढदिवस निमित्ताने वृक्ष लागवड करून साजरा केला. जयश्री धनगर यांनी आपल्या सहकारी यांच्या मदतीने त-हाडी ग्रामपंचायत प्रगंणात वृक्ष लागवड केली तसेच त-हाडी येथील अंगणवाडी मध्ये शैक्षणिक साहित्य खुच्र्या भेट दिल्या परिसर स्वच्छता करून घेतली.
ज्या भागांत सुशोभिकरण करणार आहे,त्या जागेच्या बाजूला कोणतेही वृक्ष नसल्याने तिथे दिवसभर ऊन असते.ही बाब लक्षात घेऊन जागेच्या तिन्ही बाजुला अशोक आणि करंज अशी मोठी वृक्षे यांचे वृक्षारोपण केले
.या कार्यक्रमाला माजी ग्रामपंचायत सदस्य विजय,जय मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष सुनील धनगर उप तंटामुक्त गाव युवराज भलकार तंटामुक्त अध्यक्ष तुळशिराम भामरे यांची उपस्थिती लावून जयश्री धनगर यांना कडुलिंबाचे रोपटे दिले यांच्यासह परिसरात वृक्षारोपण केले.याप्रसंगी अंगणवाडी सेविका योगिता पाटील ,सुरेख पाटील ,वैशाली पाटील , वंदना खोंडे मदतनीस बेबाबाई खोंडे मंगलबाई पारधी कोकीळ बाई भामरे प्रतिभा कंरके आदी उपस्थित होते







