दिवाळीनिमित्त १०० रुपयांत मिळणार
रवा, साखर, चणा डाळ अन् तेलही…
दिवाळी चार दिवसांवर ?गोड केव्हा होणार
शिरपूर तालुक्यातील २०६ रेशन दुकाना मार्फत ७३ हजार ५६९ शिधा पत्रिका धारकांना होणार यांचा लाभ, पुरवठा अधिकारी
प्राजक्त सोमलकर….,
त-हाडी प्रतिनीधी.
शिरपूर : दिवाळीत सर्वसामान्य
कुटुंबाला दिलासा मिळावा यासाठी
राज्य शासनाने शिधावाटप दुकानांतून
अवघ्या १०० रुपयांत रवा, साखर,
चणाडाळ आणि तेल असे चार वस्तु
देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यांचा
शिरपूर तालुक्यातील २०६ रेशन दुकाना मार्फत
७३हजार ५६९
शिधापत्रिकाधारकांना यांचा लाभ होणार
आहे. यामुळे गोरगरिबांना दिवाळी
सणाला मोठा दिलासा मिळाला
आहे.
कोरोना नियंत्रणात आल्याने सण-
उत्सवांवरील निर्बंध उठले आहेत मात्र
महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे
मोडले आहे. दिवाळीत गोडवा
वाढविणाऱ्या करंजी, चकली, लाडू,
शंकरपाळी हे पदार्थ बनविण्यासाठी
साहित्याच्या दराने
लागणाऱ्या
आसमान गाठले आहे. त्यामुळे
सर्वसामान्य नागरिकांना थोडासा का होईना दिलासा
मिळावा यासाठी राज्य शासनाने १००
रुपयांत रखा, साखर, चणाडाळ, आणि
तेल असे पॅकेज जाहीर केले आहे.
तालुक्यातील २०६ रेशन दुकानांतून
याचे वितरण होणार आहे. शिरपूर
तालुक्यातील अंत्योदय योजनेतील १३९९९,प्राधान्य योजनेतील ५९ हजार ५७०
अशा एकूण ७३ हजार ५६९
शिधापत्रिकाधारकांना यांचा लाभ
मिळणार असल्याचे पुरवठा अधिकारी प्राजक्त सोमलकर. यांनी आमंच्या दिव्य मराठी प्रतिनीधी शी बोलताना सांगितले,
शिधावस्तूंचा ४ चा संच लाभार्थी शिधापत्रिकाधारकाच्या
कुटुंबाला मिळावा व त्या संदर्भात कुठल्याही शिधापत्रिकाधारकांची तक्रारी
पुरवठा विभागात येऊ नये यांची खबरदारी रेशन दुकान दाराने घ्यायची असल्याचे पुरवठा अधिकारी सोमलकर. , यांनी सांगितले







