75 वर्ष वयोवृद्धांना प्रवास मोफत !
वाहकांसाठी ठरतोय डोकेदुखी ,
मोफत प्रवासां साठी डुबलीकेट ओळखपत्राचा वापर
त-हाडी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य सरकारने स्वतंत्राच्या अमृत मोहत्सवी आदेश पारित करून महाराष्ट्र राज्यात ज्यांचे वय 75 वर्षां पेक्षा जास्त आहे अशा जेष्ठ नागरीकांना राज्यात कुठेही प्रवास करीत असाल तर महामंडळाच्या बसेसला प्रवास भाडे लागणार नाही मोफत प्रवास करता येईल असा उपक्रम सुरु केला असला तरी हा उपक्रम अन् निर्णय वाहकांसाठी डोकेदुखी ठरु लागला आहे.
राज्य सरकारने ठरवून दिल्या प्रमाणे ज्यांचे वय 75 वर्ष झाले असलेल्या नागरीकांना महाराष्ट्रात बस मध्ये मोफत प्रवास ही योजना राबवण्याचे आदेश पारित केले आहेत या दरम्यान त्या नुसार महामंडळाकडून हा आदेश अंमलात आणत असतांना मात्र वाहकास तारेवरची कसरत करावे लागत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या वयाचा दाखला म्हणून आधारकार्ड, मतदान ओळख पत्र, पॅन कार्ड या पैकी कोणतेही पूरावा म्हणून ओळख पत्र असेल तर चालतो या आदेशान्वये प्रवाशी ओळख पत्र दाखवत आहेत व प्रवास सुद्धा करीत आहेत मात्र ज्याचे वय 50 ते 55 आहे तरी तो प्रवाशी सुध्दा अवैध पध्दतीने काढलेले बोगस डुब्लीकेट ओळख पत्र दाखवून प्रवास करीत आहेत वाहकांना समजून सुद्धा प्रवाशांना कांहीच म्हणता येत नाही, अशा मोफत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सद्या संख्या बस मध्ये दिसुन येत आहे.
60/ ते 70/ दिसून येत आहेत त्यात 65 वर्षांवरील जेष्ठ नागरीक 50% सवलतीची संख्या 10 % अपंग । % ते २ % टक्के तर फूल तिकीट देऊन 5% ते 10% प्रवाशी प्रवास करताना दिसून येत आहेत सद्या महामंडळाच्या बसेस मात्र गचागच भरून जात आहेत मात्र महामंडळाचे उत्पन्न घटत आहे.
आधिकारी कर्मचाऱ्यास सुचना करतात उत्पन्न वाढवा , बसमध्ये प्रवाशी खचाखच भरा ,शासनाचे धोरण राबविणे हे नियमांमध्ये असले तरी मोफत प्रवास हा वाहकांसाठी डोके दुःखी ठरत. यावर राज्य शासन किवा महामंडळाकडून काही ठोस निर्णय घेतले गेले नाहीतर भविष्यात महामंडळाचे चाके थांबतील किंवा उत्पन्न कमीच्या शिर्षकाखाली खाजगी करणाची यानिमीत्ताने चाहुलच आहे की काय ? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.







