• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

दिवाळीत फुप्फुसाची घ्या सर्वात जास्त काळजी;
फटाके, धुरापासून दूर राहा

माणगंगा by माणगंगा
October 21, 2022
in महाराष्ट्र
0
दिवाळीत फुप्फुसाची घ्या सर्वात जास्त काळजी;फटाके, धुरापासून दूर राहा

दिवाळीत फुप्फुसाची घ्या सर्वात जास्त काळजी;
फटाके, धुरापासून दूर राहा

डॉ. मोहन. आर. पाटील

पत्रकार ललिता खोंडे यांनी घेतली डॉक्टर मोहन पाटील यांची मुलाखत

त-हाडी : दिवाळी म्हटली की, फटाक्यांची आतिशबाजी ही आलीच. त्याचे आकर्षण सर्वांनाच असते. मात्र, फटाके सावधपणे न फोडल्यास मोठी हानी होऊ शकते. फटाक्यांमुळे देशात दरवर्षी सुमारे पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते, तर फटाक्यांच्या आवाजामुळे कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपणा येऊ शकते.


दरवर्षी सुमारे पाच टक्के रुग्ण कानांच्या गंभीर समस्यांनी त्रस्त होतात. फटाक्यांच्या वायू प्रदूषणामुळे दम्यासह विविध आजारही वाढतात. त्यामुळेच फटाके फोडताना सावधान, असा इशारा डॉक्टर मोहन पाटील यांनी दिला आहे. दिवाळी हा अतिशय व्यस्त आणि तणावाचा काळ असतो. स्वयंपाकघरांमध्ये सतत लगबग सुरू असते. दिवे, रोषणाई केली जाते आणि फटाक्यांची आतिश बाजी केली जाते. परंतु साजरीकरणाबरोबरच काही काळजीही घेतली पाहिजे. दिवाळीमध्ये शरीरावर कुठेतरी भाजले जाणे स्वाभाविक असते आणि ही दुखापत सौम्य ते तीव्र स्वरूपाच्या भाजण्याच्या जखमा अशी असू शकते.


अचानक फुटणारे फटाके कानासाठी घातक.
आवाजामुळे कानात दडे बसणे, कान दुखणे, डोके दुखणे यांपासून कानाचा पडदा फाटणे, कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येण्यापर्यंतचे त्रास होऊ शकतात. तात्पुरते बहिरेपण आल्यास औषधोपचाराने ते काही दिवसांमध्ये पूर्ववत होऊ शकतात. मात्र, कायमस्वरूपी बहिरेपणही येऊ शकते. त्याच वेळी फटाक्यांच्या रसायनयुक्त धुरामुळे नाक, कान, घसा व फुफ्फुसांमध्ये जंतुसंसर्ग होणे, खाज सुटणे आदी समस्याही निर्माण होतात

फटाके फोडताना काय काळजी घ्याल? डॉक्टर मोहन पाटील
यांनी दिलेला सल्ला

  • फटाके फोडत असताना ते पेटवल्यावर योग्य अंतर राखा.
  • जळते फटाके हातात घेऊ नका किंवा हवेत उडवू नका.
  • फटाक्यांच्या आजूबाजूला लहान मुले वावरत असल्यास लक्ष ठेवणे गरजेचे.
  • नेहमी पाण्याची बादली जवळ ठेवा.
  • रस्त्यावर अनेक लोक फटाके उडवत असल्याने हेल्मेट घालावे.
  • स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका किंवा घरात उपलब्ध असलेले ड्रॉप वापरू नका
    हे प्रथमोपचार करू शकता…
    गरम तेल किंवा बाहेरचे घटक डोळ्यात जाणे अशा सौम्य त्रासाच्या बाबतीत पिण्याचे स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात डोळ्यावर मारून डोळा पूर्णपणे स्वच्छ धुवावा किंवा कपभर पाणी डोळ्याच्या जवळ ओतत राहा आणि डोळ्यांची सतत उघडझाप करा. डोळ्यात गेलेले बाहेरचे घटक काढून टाकण्यासाठी आणि योग्य औषधे समजून घेण्यासाठी नेत्रचिकित्सकांचा सल्ला घ्या
    या लक्षणांकडे दुर्लक्ष नको
    हवेतील प्रदूषणामुळे दम लागणे, छातीत टोचल्यासारखे वाटणे, घशात सूज येणे, सर्दी आणि प्रचंड शिंका येणे, जीव घाबरणे, ॲलर्जीक खोकला येणे, छातीत घरघर होणे आदी लक्षणे दिसताच, डॉक्टरांचा सल्ला घ्या. या दिवसांत अस्थमाच्या रुग्णांनी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे महत्त्वाचे ठरते. दैनिक देशोन्नती चे प्रतिनिधी ललिता खोंडे यांच्याशी बोलताना सांगितले .
Views: 225
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडीतील ओढापात्राचे संवर्धन व सुशोभीकरण करण्यासाठी 6 कोटीचा निधी मिळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी

आटपाडीतील ओढापात्राचे संवर्धन व सुशोभीकरण करण्यासाठी 6 कोटीचा निधी मिळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)