शिरपूर तहसील कार्यालयातर्फे संगांयो व इंगांयो पात्र लाभार्थ्यांचे 385 प्रकरण मंजुर
शिरपूर : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त तहसील कार्यालय, शिरपूरच्या संजय गांधी योजना शाखेतर्फे शिरपूर तालुक्यातील गरजू, पात्र लाभार्थ्यांचे संजय गांधी निराधार योजना 77, इंदिरा गांधी वृद्धापकाळ 70, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 131 इंगांयो अपंग 01, इंगांयो विधवा 62 तसेच कुटूंब अर्थ सहाय योजना 40 असे एकुण 385 प्रकरणांवर तहसिलदार आबा महाजन यांनी जलद गतीने कार्यवाही करून मंजूर करण्यात आली,तसेच मंजुर प्रकरणाच्या लाभार्थ्यांना तहसीलदार आबा महाजन यांच्या हस्ते मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले.
लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा करण्यात येईल.तसेच कुटूंब अर्थ सहाय योजना 40 लाभार्थ्याना त्यांच्या बॅक खात्यात प्रत्येकी वीस हजार रूपये जमा होतील असे सांगीतले, यावेळी संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून विजय पाटील, इंदिरा गांधी योजनेचे अव्वल कारकून सुष्मा निळे,भारती पवार,सहायक अतुल टोळकर हे उपस्थित होते.







