आटपाडी भाजपा ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी यल्लाप्पा पवार
आटपाडी तालुका भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी यल्लाप्पा पवार यांची निवड करण्यात आली.
आटपाडी तालुक्यातील युवा नेते तसेच सामाजिक कार्यात सतत हिरीरीनें भाग घेणारे यल्लाप्पा पवार यांची आटपाडी तालुका भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष विलास काळेबाग यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत नूतन अध्यक्ष यल्लाप्पा पवार यांना देण्यात आले .
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर , युवानायक अनिलशेठ पाटील, जिल्हाध्यक्ष विलास काळेबाग, नाथा पवार, गौरव देशपांडे, अनिरुद्ध देशमुख, ओंकार दुबोले व कार्यकर्ते उपस्थित होते







