शेतकरी संघटनेच्या मागण्या संदर्भात व्हा चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांचे समर्पक उत्तर ….
विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-
सद्गुरु श्री श्री साखर कारखानास्थळी शेतकरी संघटना सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या अधिपत्याखाली शेतकरी संघटनेच्या माध्यमातुन आलेल्या शेतकरी बांधवांनी केलेल्या मागण्यांचा व्हा चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी चेअरमन शेषागिरी राव अंकल व सर्व संचालक मंडळ यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क करुन शेतकर्यांच्या हिताचा व भवितव्याचा वेध घेऊन जमलेल्या सर्व शेतकरी बांधवासमोर दिपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन समर्पक उत्तरे देत असताना मागील हंगामात गळीतास आलेल्या ऊसास आश्वासित केले प्रमाणे 223 प्रती टन दर कमी दिला या प्रश्नास 2021-2022 शासन निर्णय ससाका2021/प्रक्र101/25 नुसार 11.08 रिकवरीला 2437 यापुर्वीच जमा केले असुन दिवाळी सणानिमित्त दिवाळी गोड व्हावी याकरिता गाळपास आलेल्या ऊसाला सरसकट 2500 तर ऊशीरा आलेल्या ऊसाला 2600 रुपये प्रमाणे सर्व शेतकर्यांना बिले काल जमा केलेली आहेत .
यानंतर संघटनेने मुद्दा नंबर दुसरा उपस्थित केला की राज्यातील सर्व वजन काटे ऑनलाइन करावे यास उत्तर देताना व्हा चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील म्हणाले की गेली दहा वर्ष झाले सद्गुरु चा वजन काटा पारदर्शक असुन जर कुणाला याबाबत संभ्रम असेल तर कारखान्याकडे येणार्या चार ही रस्त्यावर शेतकरी संघटना व सद्गुरु श्री श्री कारखाना यांच्यात संयुक्तपणे वजन काटा उभारावा व त्यावर वजन करुनच ऊस गाळपास आणावा सदर काटा उभारणीचा खर्च शेतकरी संघटना व सद्गुरु कारखाना यांनी संयुक्तपणे करावा अशा प्रकारे कर्णवर पाटील यांनी अश्वासित केले त्यांनतर संघटनेने तिसरी व शेवटची मागणी केली की ऊस तोडणी मजुरांनी शेतकर्याना अतिरिक्त पैशाची मागणी करु नये यास उत्तर देताना व्हा चेअरमन म्हणाले की गेली दहा वर्षे शेतकर्याकडुन एक रुपयाही घेऊ नये म्हणुन ऊस तोड मजुर,मुकादम,वाहनमालक यांना वारंवार आम्ही सुचित करत आहोत या उपरोक्त वाढे बांधणी,ऊस वाहतुक अंतर जास्त असेल तर वाहतुक मजुरी,ड्रायव्हर जेवन इ. बाबी गावचा ठराव एकमताने घेऊन निर्णय घ्यावा
आपला ऊस लवकर तोडवा म्हणुन शेतकर्याना मजुरांना पैशाचे अमिष दाखवु नये असे कर्णवर पाटील यांनी सांगुन सर्व सहभागी शेतकर्याना मार्गदर्शन केले. या उपरोक्त चालु गळीत हंगाम 2022-2023 मध्ये गळीतास येणार्या ऊसास कारखाना तांत्रिक दृष्टया काटकसर करुण व तोडणी वाहतुक खर्च कमी करुन सभासद शेतकर्यांना गत हंगामातील दरापेक्षा जादा दर देण्याचा आमचा प्रयत्न राहील.आम्ही केलेल्या ऊसाच्या नोंदीतील सर्व ऊस देऊन सहकार्य करावे असं आव्हान केले. यावेळी आटपाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मेमाणे साहेब व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.







