शेटफळे आटपाडी राज्य महामार्गावरील सूचनाफलक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले
राज्य महामार्ग 153 वरील रस्त्याच्या बाजूने रस्त्याची माहिती देण्यासाठी लावलेले सूचनाफलक अज्ञात चोरट्यांनी कापून नेले आहेत हे फलक मागील दोन ते तीन महिन्यापासून चोरीला गेलेले आहेत मात्र अद्याप याकडे ना ठेकेदाराचे लक्ष नाही बांधकाम विभागाचे लक्ष या नवीन तयार झालेल्या रस्त्यावर दोन ठिकाणी रस्ता खोदलेला आहे त्या ठिकाणी अपघात ही झाले होते या अपघातामध्ये अनेक जण जायबंदी झाले तर एका महिलेचा जीवही गेला होता मात्र विना परमिशन रस्ता खोदल्याबद्दल रस्ता खोदणाऱ्यावर कोणतीही कारवाई झाली नाही आजही खोदलेल्या रस्त्याच्या ठिकाणी सिमेंट भरलेला आहे मात्र या ठिकाणी या तर खड्डा आहे किंवा उंचवट आहे त्यामुळे येणार जाणाऱ्या वाहनांना याचा मोठा अडथळा निर्माण होत आहे
परंतु याकडे शासकीय यंत्रणा बांधकाम विभागाचे कोणतेही लक्ष नाही रस्त्यातील अडथळ्यामुळे एखादा अपघात झाला तर पोलीस विभागाकडून सुद्धा या रस्त्याच्या अवस्थेला जबाबदार असणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याऐवजी वाहनधारकावरतीच रस्त्याच्या परिस्थितीकडे न लक्ष देता वाहन चालवून अपघातास कारणीभूत झाला अशा पद्धतीचा गुन्हा दाखल केला जातो तालुक्याच्या बांधकाम विभागामध्ये चौकशी केली असता या ठिकाणी सांगितले जाते की हा रस्ता यांच्या कार्यालयाकडे वर्ग नाही या रस्त्यावरती देखरेख करणारे कार्यालय हे कवठेमंकाळ येथे आहे किंवा कडेगाव येथे आहे अशा पद्धतीची वरवर उत्तरे दिली जातात
शासनाच्या अनेक विभागापैकी बांधकाम विभागामध्ये खूप मोठा निधी खर्च होतो तो निधी सर्वसामान्य नागरिकांच्या कामाला किती येतो हे एक मोठं गुपित आहे कारण रस्त्याच्या कामावरती होणारा खर्च हा नागरिकांच्या सुविधेसाठी खर्च होतोय असं म्हटलं जातं मात्र हा खर्च म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असाच काही प्रकार दिसत आहे रस्ते बनवत असताना एकदा का बिल निघाले की पुन्हा याकडे कोणाचेही लक्ष असत नाही यदाकदाचित कोणी तक्रार केली तरी देखभाल दुरुस्तीची तारीख संपेपर्यंत ती तक्रार तशीच लोमकळत ठेवायची व तारीख संपल्यानंतर निकाली काढायची यामध्ये ठेकेदार आणि बांधकाम विभाग यांच्या संगनमताने शासनाच्या तिजोरीतून बाहेर काढलेला निधी कसा जिरवायचा यावरच जास्त मेहनत घेतली जाते फक्त प्रसारमाध्यमांनी अशा मुद्द्यांवरती आवाज उठवून चालणार नाही तर जागरूक नागरिकांनी सुद्धा अशा मुद्द्यांवरती जागरूकपणे आवाज उठवण्याची गरज आहे







