झरे परिसरात दिपावलीच्या मुहूर्तावर चोरीचा मुहूर्त केला
विभूतवाडी मध्ये दोन घरे फोडली 6 हजार रुपये लंपास
आटपाडी प्रतिनिधी
झरे ता. आटपाडी परिसरामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावरती चोरट्याने आपला चोरीचा मुहूर्त केला विभूतवाडी ता.आटपाडी येथे श्री संत बाळूमामा यात्रेनिमित्त सायंकाळी आर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता. ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी सर्व नागरिक महिला ,पुरुष, तरुण गेले असता रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान गावातील रमेश राजाराम पुकळे यांच्या घरी चोरी झाली त्यामध्ये 6 हजार रुपये चोरट्याने लांबविले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की रात्री 11 ते 12 च्या दरम्यान रमेश पुकळे यांच्या घरी चोरांनी चोरी केली, घराला दोन खोल्या आहेत. एका खोलीमध्ये सर्वजण झोपले होते त्या खोलीला बाहेरून कडी लावली व दुसऱ्या खोलीमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील तीन ते चार पेट्या बाहेर काढल्या व त्यातील एका पेटीतील 6 हजार रुपये रक्कम चोरट्यांनी लंपास केली तर त्यातील एक पेटी घराच्या पाठीमागे नेऊन टाकली होती.
ज्या घरांमध्ये बाहेरून कडी लावली होती त्यामध्ये रमेश पुकळे यांचे आजोबा होते त्यांना लघुशंकेसाठी बाहेर जायचे होते. दरवाजा उघडतात तर बाहेरून कडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, त्यानंतर घरातील सर्व मुलांना मुलींना त्यांनी जागे केले ,त्यानंतर रमेश पुकळे यांच्या कन्येने त्यांच्या भावांना फोन करून याची माहिती दिली
ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी गेलेले त्यांचे भाऊ व गावातील तरुण यांनी घराकडे धाव घेतली घटनास्थळी आले असता हा सर्व प्रकार निदर्शनाला आला. तोपर्यंत चोरट्याने तेथून पोबारा केला होता. त्यानंतर त्या चोरट्याने ढोले मळा येते दादा परसू मोटे यांच्या दरवाज्याचे ग्रील तोडले तेथे नागरिक जागे झाले असता तिथून चोरट्याने धूम ठोकली.
यापूर्वीही एक दीड वर्षांपूर्वी झरे परिसरामध्ये 14 ते 15 चोऱ्या झाल्या होत्या, परंतु कोणत्याच चोरीचा अध्याप तपास लागला नाही. मुद्देमाल तर गेलाच परंतु चोर मिळाले नाहीत तर चोरीच्या काळामध्ये पिता-पुत्रावरती हल्ला झाला होता त्यामध्ये ते जखमी झाले होते त्यांनाही अद्याप न्याय मिळाला नाही .
आटपाडी तालुक्यातील पोलिसांकडून एकाही चोरीचा तपास होऊ शकत नाही. चोरट्यांना पकडू शकत नाहीत म्हणजे नागरिकांनी पोलिसांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही अशी चर्चा परिसरामध्ये आहे.परिसरामध्ये वाळू उपसा होत असताना पोलिसांना याची माहिती मिळतात अर्ध्या तासाच्या आत घटनास्थळी येऊन वाळू तस्करी वाल्यांना पकडलं जातं, परंतु एक दीड वर्षापासून मोठ्या प्रमाणात चोऱ्या होऊन सुद्धा एकही चोर पोलिसांना मिळून येत नाही







