गुळेवाडी गावचे सुपुत्र , मनमिळाऊ व रांगड्या स्वभावाचे,समाजसेवक हिंदुरावशेठ थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त …..
माणगंगा न्यूज चा स्पेशल रिपोर्ट..
विशेष प्रतिनिधी- सौरभ पुकळे,(मुंबई- कळंबोली )
आटपाडी प्रतिनिधी
सांगली जिल्ह्याचे शेवटचे टोक, सांगली जिल्हा व सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवरील ,तर आटपाडी तालुक्याच्या पश्चिमेकडील शंभर ते दीडशे उंबरा असणारे गुळेवाडी गाव.
याच गुळेवाडी गावामध्ये हिंदुराव थोरात यांचा जन्म 1971 मध्ये झाला. हिंदुराव शेठ यांचे आई-वडील दोन बहिणी व एक भाऊ असा परिवार असे, त्यामध्ये नंदाताई ही थोरली बहीण होती, त्यानंतर हिंदुराव थोरात यांचा जन्म 19 71 मध्ये झाला त्यांच्यापेक्षा छोटा एक भाऊ आणि एक बहीण असा त्यांचा परिवार आहे.
त्यांचे वडील बाबुराव थोरात यांच्या शेळ्या होत्या, शेळ्या राखून कसंतरी कुटुंबाची उपजीविका भागवत होते. हिंदुराव शेठ यांचे वडील बाबुराव व आई पारूबाई हे फार कष्टाळू होते. त्यांनी त्यांच्या परिस्थितीनुसार हिंदुराव शेठ यांना जि. प. शाळा विभूतवाडीमध्ये पाचवी पर्यंत शिक्षण कसेबसे दिले .
घरची हालाकीची व गरिबीची परिस्थिती असल्याने पुढील शिक्षण देता आले नाही. तर हिंदुराव हे त्यांची आत्या म्हणजेच वडिलांची बहीण नांगरे कुटुंबामध्ये दिल्या होत्या, विभूतवाडी व गुळेवाडी चे चार किलोमीटरच्या अंतर असल्याने वय लहान असल्याने शाळेसाठी ये जा करण्याऐवजी त्यांनी वडिलांची बहीण म्हणजे हिंदुराव ची आत्या यांच्या घरी राहण्यास सुरुवात केली व तिथूनच atआत्याच्या शेतीतील छोटी मोठी कामे करून पाचवीपर्यंत कशी बशी शाळा शिकले.
घरी उत्पन्नाचे साधन कोणतेही नव्हते सततचा दुष्काळ, जमिनीमध्ये उत्पन्न निघत नव्हते, त्यामुळे कसेतरी जीवन जगत होते, त्यामध्ये शिक्षण घ्यायचं म्हटलं तर आर्थिक परिस्थिती नव्हती.
वडील बाबुराव थोरात हे शेळ्या मेंढ्या राखून कसतरी जनजीवन जगत होते
हिंदुराव थोरात व जालिंदर थोरात दोघे भाऊ दोन बहिणी आई-वडील असा परिवार असून घरामध्ये कमवतं कोणीच नव्हतं, त्यामुळे हिंदुराव थोरात यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिले .
त्यानंतर गुजरातला गेले दुसऱ्याच्या गलाई व्यवसाय असणाऱ्या दुकानांमध्ये कामाला राहिले ,त्यानंतर हळूहळू प्रगती होऊ लागली,गलाई व्यवसाय पूर्ण पणे शिकले, त्यांचा भाऊ जालिंदर थोरात हेही राजस्थान ला गेले आणि 20 ते 25 वर्ष कष्ट केल्यानंतर आता कुठेतरी गाडी रुळावर आली.
रुक्मिणी संसारात आली आणि संसाराचं सोनं झालं
हिंदुराव थोरात यांचे लग्न विभूतवाडीतील वाघमोडे यांच्या कुटुंबातील रुक्मिणी नावाच्या मुलीबरोबर झाले आणि खरोखरच त्यांच्या घरामध्ये रुक्मिणीच्या रूपाने लक्ष्मी आली, आणि उद्योगधंद्यामध्ये भरभराटी झाली.
हिंदुरावशेठ व रुक्मिणी यांना तीन मुली असून पहिल्या मुलीचं लग्न झाले असून दुसऱ्या दोन्ही मुली शिक्षण घेत आहेत.
सर्व सुरळीत असताना विपरीत घडले आणि गुळ फॅक्टरी उद्योगांमध्ये तोट्यात गेले
चार पैसे जवळ आले होते आपण गरिबी जवळून अनुभवली आहे, असे अनेक तरुण समाजामध्ये गरिबीच्या यातना सोसत आहेत, अशा तरुणांसाठी आपण उद्योग देऊ शकतो, आपण गरिबीच्या झळा सोसल्या असून त्या इतरांना झळा बसू नयेत ,म्हणून त्यांनी माळशिरस भागामध्ये गुळ फॅक्टरी सुरू केली, परंतु नियोजन चुकल्याने व गुळ फॅक्टरीमध्ये अनुभव नसल्याने गूळ फॅक्टरी संपूर्ण तोट्यात गेली. त्यामध्ये त्यांचे अतोनात नुकसान झाले, माझ्याच नशिबाने झाले असे समजून ऊस उत्पादक धारकांचे स्वतःची प्रॉपर्टी विकून शेतकऱ्यांची बिले भागवली. आपण फसलो म्हणून या गोरगरीब शेतकऱ्यांना फसू द्यायचे नाही. त्यांचा तोटा करायचा नाही अशी त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली व अक्षरशा कमवलेली प्रॉपर्टी विकली आणि त्या शेतकऱ्यांची बिले भागवली.
तसेंच त्यांच्या संसाराची गाडी रुळावर येत असतानाच समाजामध्ये असे अनेक तरुण परिस्थितीने गंजलेले आहेत अशा तरुणांना सुद्धा त्यांनी हातभार लावला .अनेकांना आर्थिक मदत करून उद्योग उभा करून स्वतःच्या पायावर उभा केले. काहीजणांना पूर्ण ताकदीनिशी सर्व प्रकारची मदत करून त्यांचे संसार उभे केले. यासाठी हिंदुराव शेठ व जालिंदर शेठ यांनी भरपूर प्रयत्न केले.
हिंदुराव थोरात म्हणजे सरळ ,रांगड्या, भाबड्या स्वभावाचे असून त्यांच्या स्वभावामुळे अनेक गोतावळा त्यांनी जवळ केला. त्यामध्ये नातेवाईक मित्रमंडळी तरुण वर्ग यांच्याशी त्यांची जवळीक होऊ लागली.
त्यानंतर त्यांना हळूहळू समाजकार्याची आवड निर्माण होऊ लागली . अनेकांना त्यांनी मदत केली. समाज कार्यामध्ये हिरिरीने भाग घेतला मग ते गावची यात्रा असो किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये रंजल्या गांजलेल्यांना त्यांनी मदत केली .अनेकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत केली.
असा मनमळावू,रांगड्या स्वभावाचा युवा नेता म्हणजेच हिंदुराव थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
यामध्ये प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, लष्कर अधिकारी, निवृत्त अधिकारी मुख्याध्यापक ,शिक्षक ,पत्रकार ,राजकीय व शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन हरीशेठ गायकवाड ,माजी पंचायत समिती उपसभापती तानाजी शेठ यमगर ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव एन.पी. खर्जे, उद्योजक सुखदेवशेठ पुकळे ,उद्योजक आप्पाशेठ थोरात व समाजसेवक सुखदेवशेठ पुकळे यांनी नियोजन केले आहे.
अशा या मनमिळावू रांगड्या स्वभावाच्या समाजकार्यात हिरीरीने भाग घेणाऱ्या समाजसेवक हिंदुराव थोरात यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…







