धावडवाडी ता. जत येथे इमदाद फौंडेशन मार्फत बाकड्यांचे लोकार्पण करण्यात आले.
माणगंगा न्यूज पोर्टल धावडवाडी:-
धावडवाडी येथील इमदाद फौंडेशन यांच्यामार्फत गावातील लोकांसाठी प्रत्येक चौकामध्ये बसण्यासाठी बाकड्यांची सोय करण्यात आली. इमदाद फौंडेशन सतत लोकसेवेसाठी सज्ज असतो.इमदाद फौंडेशनच्या माध्यमातून लोकांसाठी अनेक सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत.
इमदाद फौंडेशनचे अध्यक्ष व सदस्यांनी गावातील काही लोकसेवा करणारया नागरिकांना बाकड्यांची कल्पना सुचवली असता, याकल्पनेला हिरवा कंदील मिळाला व सर्व सदस्यांच्या सहकार्यातून व सहभागातून ही बाकडी बसविण्यात आली.
इमदाद फौंडेशनचे सदस्य व गावातील काही जनसेवकांनी आपल्या हयात नसणाऱ्या प्रिय व्यक्तिंच्या स्मरणार्थ बाकड्यांचे सहकार्य केले.या कार्याबद्दल गावातील सर्व स्तरातून या कार्याचे कौतुक होताना दिसत आहे.यापुढील काळात देखील इमदाद फौंडेशन नेहमीच जनसेवेसाठी सज्ज व सतर्क राहील हि अपेक्षा असुन इमदाद फौंडेशनला भावी वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा.







