दिल्ली च्या बादशहा ला खुश करण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेशी बेयमानी करणारे शिंदे सरकार .
सुरज पाटील
आटपाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्राच्या हक्काचे उद्योग गुजरात च्या घशात घालणाऱ्या शिंदे व फडणवीस सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात आटपाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष सुरज भैया पाटील व राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव नवी मुबई चे निरीक्षक प्रा नारायण खरजे सर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी आटपाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज भैया पाटील बोलताना म्हणाले स्वराज्याची गवताची काडी सुधा कोणाकडे गहाण रहाणार नाही असे सांगणाऱ्या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शंदे व देवेंद्र फडणवीस दिल्ली कराना खुश करण्यासाठी महाराष्ट्रातील युवकांच्या हक्काचे उद्योग गुजरात च्या घशात घालत आहेत
आपण ज्या राज्याचे प्रतिनिधित्व करतो त्याच राज्यातील युवकांच्या माथी बेरोजगारीचा शिक्का मारणाऱ्या या सरकारचा आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करतो.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव एन.पी.खरजे यांनी महाराष्ट्र राज्याच्या हक्काचा टाटा एअर बस का हक्काचा उद्योग गुजरातच्या घशात घालून महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार करणाऱ्या या शिंदे सरकारचा निषेध व्यक्त करताना प्रत्येक महिन्याला एक नवीन उद्योग सत्ता टिकवण्यासाठी गुजरातच्या घशात घालणार्या सरकारचा निषेध व्यक्त केला.
या आंदोलनास युवा उद्योजक अतुल पाटील ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश गुरव ,कामत गावचे सरपंच परशुराम सरक, आटपाडी चे युवा नेते आबासाहेब नांगरे पाटील,तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष प्रशांत मोठे ,,तालुका उपाध्यक्ष विशाल जाधव ,जिल्हा युवक राष्ट्रवादी उपाध्यक्ष रणजित पाटील,राष्ट्रवादी सोशल मीडिया तालुकाध्यक्ष किशोर गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस नितीन डांगे , पदवीधर सेल तालुका अध्यक्ष दत्तात्रय रावळ तालुका कार्याध्यक्ष मनोज भोसले, अनिल गायकवाड, दिघंची गावचे युवक नेते अतुल जावीर, भाऊसाहेब देशमुख, अमित मोरे, सुखदेव खताळ, पिंपरी गावचे माजी उपसरपंच आशिष जाधव ,गणेश आईवळे सर ,करगणी गावचे युवा नेते हिम्मत दबडे ,माजी ग्रा.प.सदस्य विनोद बनसोडे, सुखदेव खताळ,नवनाथ डांगे ,मनोज जाधव ,प्रवीण देशमुख,भरत लांडगे ,सुहास खंदारे यांच्यासह तालुक्यातील अनेक युवक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारचा घोषणा देऊन निषेध व्यक्त केला







