• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

दोन वर्षापासुन नविन रेशन कार्ड धारक रेशन धान्य पासुन वंचित……रेशन कार्ड धारक आणि डिलर मध्ये उडताहेत शाब्दीक खटके

माणगंगा by माणगंगा
November 5, 2022
in महाराष्ट्र
0
दोन वर्षापासुन नविन रेशन कार्ड धारक रेशन धान्य पासुन वंचित……रेशन कार्ड धारक आणि डिलर मध्ये उडताहेत शाब्दीक खटके

दोन वर्षापासुन नविन रेशन कार्ड धारक रेशन धान्य पासुन वंचित

रेशन कार्ड धारक आणि डिलर मध्ये उडताहेत शाब्दीक खटके

दिव्यांग व्यक्ती लाभाच्या प्रतीक्षेत

त-हाडी ता.३ नोव्हेंबर= तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांची संख्या सुमारे २०६ आहे,मागील काही वर्षांमध्ये अनेक कुटुंबांचे विभाजन झाल्याने अनेक कुटुंबातील सदस्यांनी वेगवेगळे रेशन कार्ड महसुल विभागा कडुन बनविले आहे.परंतु दोन वर्षापासून या रेशन कार्ड धारकांना हक्काचे राशन मिळत नसल्याने तालुक्यातील अनेक गावामध्ये रेशन कार्डधारक आणि स्वस्त धान्य डिलर मध्ये शाब्दीक खटके उडत आहेत.


ऑनलाईन रेशन कार्डचा नंबर आला,हो तरी स्वस्त धान्य डिलर रेशन देत नाहीत,तर ऑनलाईन नंबर आला परंतु आमच्या ई -पाॅस मशिनमध्ये ग्राहकांचा डाटा दिसत नाही ही आवस्था हल्ली गावोगावच्या रेशन कार्ड धारक आणि डिलर अंतर्गत होतांना मोठ्या प्रमाणात दिसत आहे.राज्य शासनाचा आनंदा शिधा विविध चर्चेला उधाण आणुन गेलेला आहे,कारण दिवाळी संपल्या नंतर आनंदाचा शिधा पोहचला,कारण तालुका प्रशासणाचीच आनंदाचा शिधा जमवा-जमवीसाठी त्रेधा त्रिपीट झालेली दिसली.शिरपुर तालुक्यातील अनेक गावातील स्वस्त धान्य दुकानदारांना आनंदाच्या शिधा किटचा पुरवठा वेळेत झालाच नाही.शेवटी लाभार्थ्यांचा आकांत पाहाता,पुरवठा विभागाच्या फर्मानानुसार तालुक्यातील अनेक स्वस्त धान्य दुकामदारांनी आनंदाच्या शिधा किट आप आपल्या गावातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये पोहचता केला,विशेष म्हणजे यावेळी पुरवठा विभागाच्या ‘द्वारपोच’ योजनेचा काही प्रमाणात बट्ट्याबोळ झाल्याची खमंग चर्चा आहे.या आनंदाच्या शिधा किटने आनंदा पेक्षा दुखःच जास्त दिल्याचे विविध स्तरातुन बोलल्या जाते.तालुक्यातील २०६ रेशन दुकान अंतर्गत शेकडो नविन रेशन कार्ड धारक जवळ कार्ड आसतांनी सणा सुदीच्या दिवसामध्ये हक्काच्या धान्य पासुन वंचित राहात आहेत.

आधीच रेशन कार्ड बनविने म्हणजे लाभार्थ्यासाठी तारेवरची कसरत म्हणावी लागेल कारण महसुल विभागामध्ये बहुतांश कामे चिरीमिरी दिल्या शिवाय म्हणे फाईल पुढे सरकतच नाही.ज्या कुटुंबांना रेशन कार्ड पुरवठा विभागाने प्रदान केले आहे.मग रेशन साठी मागील दोन वर्षापासून ताटकळत का? ठेवण्यात आले आशा प्रकारचा संताप पुरवठा विभागा विरोधात रेशन कार्ड धारक व्यक्त करीत आहेत.

प्रतिक्रिया
शासनाच्या नियमानुसार आम्ही विभक्त कुटुंबाना धान्य देऊ शकत नाही.
पुरवठा अधिकारी
प्राजक्त सोमलकर शिरपूर

   प्रतिक्रिया

मी केल्या ५ वर्षांपासून विभक्त आहे व माझ्याकडे विभक्त राशन कार्ड आहे पण आम्हाला शासनाने विभक्त राशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही
शासनाने विभक्त कुटुंब राशन कार्ड धान्य द्यावे व राशन कार्ड सुरू करावे

 मधुकर संतोष पाटील 

विभक्त कुटुंब राशन कार्ड धारक

शिरपूर तालुक्यातील विभक्त कुटुंब राशन कार्ड धारक – ३६९५४

शुभ्र राशन कार्ड धारक -१९४१

अंत्योदय राशन कार्ड धारक – १३९९९
प्राधान्य कुटुंब राशन कार्ड धारक – ५९५७०

चौकट


शासन स्तरावरून प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय लाभार्थी उत्पन्नाच्या मर्यादा नुसार कार्डधारक लाभार्थ्याला धान्याचा लाभ देणे आवश्यक आहे परंतु तसे न होता तालुक्यात बरेच गरजू लाभार्थी धान्यापासून व कार्ड पासून वंचित आहेत ज्यांच्याकडे चार चाकी वाहने दोन चाकी वाहने महागडे एक एक लाखाचे मोबाईल पक्के घरे आठ ते दहा एकर च्या पुढे जमीन अशा लोकांकडे प्राधान्य कुटुंब व अंतोदय योजनेचे कार्ड आहे दुसरी गोष्ट म्हणजे प्राधान्य कुटुंब व अंतोदय कुटुंब या कार्डातील विभक्त झालेले ग्राहकांना धान्याचा लाभ मिळत नाहीत वास्तविक पाहता मोर्चे पहिले कुटुंब हे या धान्याचा लाभ घेण्यास पात्र असते व त्यामधून ते अलिप्त केलेले असते परंतु यांना धान्याचा लाभ पासून वंचित का ठेवले जाते ? आणि तालुक्यातून असे बरेच परंतु अत्यंत गरीब गरजू लोक यापासून वंचित आहेत

  चौकट

अपंग लाभार्थ्यांना शासनाकडून तसे आदेश आहेत की त्यांना अंत्योदय योजनेचा धान्याचा तात्काळ लाभ देण्यात यावा परंतु शिरपूर तालुक्यात तसे एकही उदाहरण दिसून येत नाही अपंग लाभार्थ्यांकडून त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात येत नाही नेमकं शिरपूर पुरवठा विभागाने गरजू गरीब लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी जनतेकडून मागणी होत आहे

Views: 178
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
माननीय सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना आम आदमी पार्टी – धनंजय रामकृष्ण शिंदे, राज्य सचिव यांचे निवेदन

माननीय सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना आम आदमी पार्टी - धनंजय रामकृष्ण शिंदे, राज्य सचिव यांचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)