लम्पि आजाराने मृत्य बैलाची पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे नोंदच नाही
शेतकऱ्याचे 58 हजाराचे नुकसान ,नुकसानीला जबाबदार कोण ?
संबंधित अधिकाऱ्यावर करवाही व्हावी , व मृत्य बैलाची नुकसान भरपाई मिळावी
झरे ता. आटपाडी येथील नंदकुमार नामदेव भानुसे शेतकरी असून त्यांच्या मालकीचे दोन बैल असून त्यापैकी एक बैल दिनांक 23 ऑक्टोबर 2022 रोजी बैलाच्या मागील पायावर सूज आल्याचे ,तसेच शरीरावर गांधी आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यानी झरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गेले असता तेथे पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी अनेकदा फोन कॉल केला परंतु फोन कॉल त्यांच्याकडून रिसिव्ह केला गेला नाही. त्यानंतर सातत्याने तीन दिवस पशुवैद्यकीय दवाखान्यात शेतकरी गेले तरीसुद्धा पशुवैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याचे आढळले.
त्यानंतर भानुसे यांनी कुक्कुडवाड येथील खासगी डॉक्टरशी संपर्क साधून सदर बैलावर उपचार सुरू केला. परंतु मागील तीन दिवसांपूर्वी बैल दगावला असल्याने त सुमारे 50.000 हजाराचे नुकसान झाले तर खासगी डॉकटरकडून केलेल्या खर्चाचे रु. 8,000 असे एकूण रु. 58,000 हजारांचे नुकसान झाले आहे.
बैल मृत्य पावला त्यादिवशी झरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन चौकशी केली असता अधिकारी रजेवर असल्याने भेटले नाहीत. डॉक्टर उपस्थित नसल्याने मेलेल्या बैलाची नोंद किंवा पंचनामाही करण्यात आला नाही. बैल आजारी असतानाच्या कालावधीत डॉक्टर उपस्थित नसल्याने तसेच पशुवैद्यकीय विभागाकडून पर्यायी व्यवस्था नसल्याने सदर बैलाची नोंद करता आली नाही.
आता तीन दिवसांपूर्वी त्यांच्या दुसऱ्या बैलाला सुद्धा लम्पी सदृश्य लक्षणे आढळून आली आहेत. त्याची खरसुंडी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नोंद केली आहे . तसेच त्याच्यावर एकदिवस उपचार केला आहे .परंतु मागील दोन दिवस उपचाराचे सातत्य नाही. त्यांना अशी भिती वाटते की मागील बैलाचा जीव गेला तशी या बैलाचीही अवस्था होते की काय?
तसेच माझी घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून माझे कुटुंब निव्वळ शेतीवर अवलंबून आहे. एक बैल तर गेलाच परंतु दुसऱ्या बैलावर तरी वेळेवर उपचार व्हावेत. तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने व त्यांची पर्यायी व्यवस्था नसल्याने मेलेल्या बैलाची नोंद होवू न शकल्याने नुकसान भरपाई मिळणार का ? नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे तरी नृत्य बैलाची नोंद न करणाऱ्या अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी भानुसे यांची आहे.







