नवाळीच्या तूर शेंगाच्या आमटीची चवच निराळी
शेतकरी,शेतमजूर कूंटुबीयात जेवनात सर्वाधिक आवडणारी आमटी ज्वारीची भाकर कांदा मिरची
-त-हाडी प्रतिनिधी ता,06 नोव्हेंबर…जिल्हात तूरीचे पिक प्रामूख्याने घेतले जाते,हिवाळी आला की नवाळीत जेवनामध्ये तूरीच्या शेंगावर सर्वाधिक जोर असतो,तूरीच्या दाण्याचा भात,तूर दाणे टाकून फोडणीची खिचडी असो का मग तूर दाण्याची ऊसळ,आळण,आमटी,अश्या प्रकारे नवाळीचे खाद्य जेवनात तूरीच्या शेंगाचे जेवन बनविल्या जाते,शेतकरी कूंटूबीयात तर दररोज ही आमटी मोठया चवीने दररोजच्या जेवनात राहत असून हीरव्या मिरच्या,तूरीचे कवळे दाणे बारीक केले की तैल मिठ टाकून ताबडतोब आमटी बवनिल्या जाते ज्वारीची गरमागरम भाकर कांदा अश्या प्रकारे शेतकरी कूंटूबीयाचा जेवनाचा मेनू राहते,ग्रामीण भागात तूरीच्या शेंगा सहजपणे ऊपलब्ध होतात,शेतकरी कूंटूबीय शेतमजूर शेतातील तूरीच्या नवाळीच्या शेंगा घेवून येतात तसेच शहरीभागात नवाळी असल्यामूळे तूरीच्या शेगाची मागणी सर्वाधिक राहते,शहरातील महीलागण,तुरीच्या दाण्याची फोडणीची खिचडी,उसळ,तुरीच्या दाण्याचा झूणका,तूरीच्या दाण्याचे कढीगोळे,तूरीच्या दाण्याचा गोळाभात,आळण,आमटी बनविण्यात जास्त भर असते,शहरी आमटीची चवच निराळी राहत असुन शहरातील महीलागण तुरीचे दाणे,बारिक चिरलेला कांदा,हीरव्या मिरच्या,बारिक चिरलेला टोमॅटो,धणोपूड,जिरेपूड,हळद,आलंलसून पेस्ट,जिरे,हिंग,मोहरी,तैल,मीठ,कोथिंबीर आणी आवश्यकतेनूसार गरम पाणी अश्या प्रकारे आमटी बनवितात,शेतात तूरीला कौवळ्या शेंगा लागल्या पासून आमटी बनविण्यात शेतकरी कूंटूबीय व शेतमजूर आमटी करिता शेंगा घेवून जातात तसेच शहरात ही तुरीच्या शेंगा विक्रीत सर्वाधिक येतात,ज्याकडे शेत नाही असे अनेक जण शेतकर्यासह शेत मजूरांना आमच्या साठी नवाळीच्या तूरीच्या शेंगा घेवून येसाल अशी मागणी सूध्दा करतात यामूळेच आमटी करिता शेतातील तूरीच्या शेंगाची मागणी वाढते,म्हणूनच तर म्हणताना नवाळीच्या तूरीच्या शेंगाच्या पातळ आमटीची चवच निराळी







