सोयगाव :
जगाला तारण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ.भिमराव आंबेडकराच्या विचारांची गरज… परिषदेचे अध्यक्ष भिक्खु ताईजो इमानाका जापान
तथागत गौतम बुद्ध , डॉ.बाबासाहेब जय घोषणानी वातावरण दुमदुमूले ….
{ सोयगाव / विजय पगारे }
जापान मध्ये पूर्वीपासून कापड,मातीची भांडी,खेळणी इत्यादी उद्योग प्रमुख होते.गेल्या काही दशकात जपानने औद्योगिक क्षेत्रात फार मोठी झेप घेतली आहे.त्यामुळे आता जपान मोटारी,जहाजे इत्यादींच्या निर्मितीत अग्रगण्य मानला जातो.तसेच विजेवर चालणारी उपकरणे,घड्याळे कॅमेरा,संगणक,रोबो इत्यादी इलेक्ट्रोनिक वस्तूंच्या उत्पादनातही जपान पुढे आहे.मारूती सुझीकी, होंडा सारख्या विविध ११४ कंपन्यां आहेत. रेशमी किड्यांचे पालन करून त्या पासून रेशीम व रेशमी कापड तयार करणे हा येथील महत्त्वाचा व्यवसाय आहे.मोती काढण्याचा व्यवसायही येथे मोठ्या प्रमाणावर चालतो.
बौद्ध धर्म हा जपानमध्ये मुख्य धर्म आहे.
बौद्ध धर्माचाच शिंतो नावाचा जपानी पंथ येथे अधिक प्रमाणात आहे. जपानच्या लोकसंख्येत ९६% जपानी हे बौद्ध धर्मीय आहेत. भारतानं तर १००० वर्षांनंतर बौद्ध धर्म अस्तित्वात आला,आम्ही सर्व जपानी तूमचे लहान बंधू आहोत.तरी सुद्धा आम्ही बुध्दाचे चरीत्र सोडलेले नाही. बौध्द धर्मात विज्ञानवादी असल्याने जपानसह बौधिष्ट देशांनी औद्योगिक क्षेत्रात मोठी प्रगती केली.इ.स.२०१५ ला जपानमध्ये हजार वर्षे पुर्ण झाले मोठा उत्सव साजरा करण्यात आला, निमित्ताने कोयासिला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य मोठा पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले,
डॉ. बाबासाहेब हे भारतरत्न नसुन ख-या अर्थाने विश्वरत्न आहेत.यांचे शिल्पकार तथागत आहेत, भारत देशात मोठ्या प्रमाणात बुध्दीष्ट आहेत. त्यांनी आमच्या जापानच्या विहाराला मोठी आर्थिक मदत दिली,विहारात ११४ औद्योगिक कंपन्यांचे बुध्दीष्ट मालक कर्मचारी तथागतांचे विचार ऐकण्यासाठी येतात त्यामुळे मालक व कामगार सर्वासोबत आपुलकीने वागतात.सर्वात जास्त कंपनीतील कामगार हे भारतीय आहेत सर्व बुध्दांच्या विचारावर वागतात मोठी औद्योगिक क्रांती झालेली आहे, त्यांच्या रूधयात व तुमच्या रुपयांत मला तथागत दिसतात.विज्ञानाची कास धरुन येथिल तरणांनी भारतातही औद्योगिक क्षेत्रात प्रगती केली पाहिजे.
असे मला वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुध्दिझम द्वारा आयोजित सत्याशी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत धंम्म देसना देतांना परिषदेचे अध्यक्ष भिक्खु ताइजो इमानाका जापान यांनी मंगळवारी ( ता.८ ) रोजी सांगितले .
धंम्मविचार पिठावर भदन्त धम्मसेवक महाथैरो,. अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भिक्खु संघ , परिषदेचे उद्घाटक भिक्खु लामा रंगडोल सिएटल अमेरिका, भिक्खु उपगुप्त महाथेरो पुर्णा , भंत्ते संघरत्न , भत्ते बोधी धंम्माचल फर्दापूर धंम्मासह विविध देशांतील – विविध राज्यांच्यातील भंत्तेजी धंम्मदेसनेसाठी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार , युवकांचे आशास्थान अब्दुल समिर , अनिलकुमार ब. गायकवाड मुंबई,सु.ल. जाधव, जी.एस, कंधारे,बी.टी.आगमाने, आर.के. गायकवाड,अशोक येरेकर,एम.एस.भगत उपस्थिती होते.तर धंम्मदेसनेसाठी गहन करण्यासाठी देशभरातून लाख्खो उपासिका , उपासक तुटून पडले यावेळी मंत्रमुग्ध कमालीच्या निसर्ग रम्य शांततेत उपस्थितांनी धम्मदेसना गहन करुन घेतली.
परिषदेचे उद्घाटक सिएट अमेरिका येथून आलेले यांनी धंम्मदेसना देतांना सांगितले की, जगाला युद्ध नको असुन बुध्दाच्या विचारांची व बाबासाहेबांच्या साहीत्याची – विचारांची अरी गरज आहे मी मानतो . तथागतांच्या, डॉ . बाबासाहेबांच्या,आदी संतांच्या पावन भारत भुमित यापुर्वी दोन वेळा आलो नासिक जिल्ह्यातील खैरलांजी येथिल भोतमांगे कुटुंबावर सुवर्ण समजना-या सुवर्णाकांनी बौद्धावर अत्याचार केले. त्याची माहिती घेवून अमेरिकाचे अध्यक्ष यांना भारतात होणा-या बौद्धावर होणा-या अन्याविषयी निवेदन दिले होते. तथागत, बाबासाहेब यांचे अनुयायी भारतात बाहेर देश विदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत.कोलोंबो च्या विद्यापीठात मी तथागतांचे विचारांवर मार्गदर्शन दिले यात मोठ्या प्रमाणात सुरक्षित होते.माझा उद्देश त्यांना ध्यानसाधना शिकवणे होता, उपस्थितांना यावेळी प्रश्नः विचारला बुध्दीष्ठानी अफ्रिकेवर युध्द केले का ? असं कधी झाल का बुध्द लोकांनी हत्या केली ? यावेळी खुपच शांततामय वातावरण होते,मला असे लक्षात आले की, मानवाची विचार करण्याची क्षमता वापरल्या जावू शकते, अमेरिकेत आमच्या कुटुंबातील पिढीत गेल्या २०० वर्षांपासून अन्याय झाले. माझ्या कुटूंबातील मी पहिल्यांदा बौद्ध दिक्षा घेतली व बौद्ध झालो.बौध्द होण्यापूर्वी आम्हांला खुप गुलामगिरी
करावी लागली, बालपणी शिक्षण घेत असतांना बाबासाहेब विषयी शिकवले नाही.अभ्यास केल्यावर मी पुर्वी ज्या धर्मात होतो त्या धर्माचा ग्रंथ जाळला तेव्हा मला वाटले होते की, एखादा चमत्कार होईल मला ईश्वर शिक्षा देतील मात्र तसे काहीच झाले नाही.आत्ता मी बुध्दीष्ट आहे.मला माझ्या परिवाराने व मित्रानी त्यागले.ते सर्व मला विसरले.परिनामी मी एकटाच पडलो, बौद्ध धर्माचे न्यान जसं जसं अवगत करत गेलो तसे तसे ख्रिचन धर्मिय दुरावत गेले,या धर्मात बाहेर जाण्याचा रस्ता नाही.आंबेडकर लिखित जातियत्तेचे निमृलन पुस्तक वाचल त्यात थोडा बदल करून त्यात काळा वर्ण व गोरा वर्ण शब्द टाकले हे वाद अमेरिकेत अधिक आहे, त्यामुळे चमत्कार झाला.वर्णवाद कमी होत आहे. आत्ता मला भिती वाटत नाही.अमेरिकेत दु:खा चे निर्मुलन होत आहे.तथागताचा धंम्म व आंबेडकर यांचा विचार जगाला तारू शकतो धंम्माचल फर्दापूर येथे ईतक्या मोठ्या प्रमाणात बौद्ध उपासक,ऊपासिका धंम्मज्ञान आत्मसात करण्यासाठी देशभरातून स्व:ता पैसे खर्च करून येतात शांततेत विचार ऐकतात हे जगातील अनेक देशांत माहीत नाही.त्यांना या विषयी मी सांगनार आहे , पुढील परिशदेला या पेक्षा मोठ्या संखेने उपासक येतील,असे भिक्खु लामा रंगडोल म्हनाले.दरम्यान भिक्खु ज्ञानरक्षित भंत्ते यांनी धंम्मदेसना देतांना सांगितले की, देशाला विकासाची वाटचाल करायची असेल तर डॉ.बाबासाहेबांनी भारतीयांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा अंगिकाराव्या लागतील पुढील लग्ण कार्यात व बौद्ध धर्मियांच्या कार्यात या प्रतिज्ञा घेतल्या शिवाय ते कार्य पुर्ण होनार नाही. गेल्या दोन वर्षांत कोरोना १९ काळात औषध उपचार विना ब्रम्ह, विष्णू,महेश,गौरी,गणपती अश्या ३३ देवी देवतांनी नाही तर डॉक्टरांनी वाचवले . विज्ञानाची कास धरा असा उपदेश या वेळी दिला.
अब्दुल सत्तार राज्याचे कृषी मंत्री व मित्र मंडळाने देशभरातून आलेल्या उपासक,उपासिका यांना भोजनदान दिले गेल्या पाच वर्षांपासून भोजनदान चे कार्य मित्र मंडळ करीत आहे.उपस्थित उपासिका,उपासिकानी सुध्दा आपल्या परिने भोजनदान,जलदान दिले अतीशय तथागतांचा, बाबासाहेबांच्या जयघोष करीत शांततेत धम्म परिषदेत सर्वानी लाभ घेतला.







